You are currently viewing पंढरीची वाट

पंढरीची वाट

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम अभंग रचना*

 

        *पंढरीची वाट*

 

पंढरीची वाट | तोडी भवपट ||

डोळ्यांपुढे नीट | जगजेठी ||

 

वैकुंठ पंढरी | चंद्रभागे तीरी ||

धावे वारकरी | मनोभावे ||

 

देहाचा मृदुंग | हाताचेच टाळ ||

अभंगाची ओळ | मुखामधे ||

 

सोपविले तुझ्या | पायी सर्व सुख ||

दावी रे श्रीमुख | पांडुरंगा ||

 

काया वाचा मने | शरण मी आले ||

मी-पण वाहिले | पायी तुझ्या ||

 

ज्योत्स्ना तानवडे. पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा