भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी खारेपाटण येथील पूरातील नुकसानीची केली पाहणी
*पूर ग्रस्तांची घेतली भेट,केली विचारपूस
*नुकसानीचे पंचनामे तातडीने शासनाकडे पाठवा ;अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
*सुख नदीचा गाळ उपसणार ;दिले आश्वासन
कणकवली
खारेपाटण बाजारपेठेत पूरस्थिती निर्माण होऊन झालेल्या नुकसानीची भाजप नेते,केंद्रीय माजी मंत्री ,खासदार नारायण राणे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. ज्या कुटुंबांचे नुकसान झाले त्यांच्याशी त्यांनी थेट संवाद साधला. अधिकाऱ्यांना नुकसान भरपाईचे पंचनामे तातडीने करून शासनाकडे त्याचा अहवाल पाठवा असे आदेश दिले. पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सुख नदी पात्रातील गाळ काढण्याचे काम उन्हाळ्यात युद्ध पातळीवर केले जाईल असे आश्वासन यावेळी खासदार नारायण राणे यांनी दिले.
मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये प्रामुख्याने कणकवली तालुक्यातील खारेपाटण भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. येथील बाजारपेठेत मेडिकल, भूषारी दुकाने, हॉटेल्स, कापड दुकाने, बसस्थानक, मोबाईल शॉप, हार्डवेअर तसेच एका मंदिरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले होते. याच पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी आज खारेपाटण येथे भेट देउन नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली. तसेच प्रशासकीय अधिकऱ्यांकडून देखील उद्भवलेल्या आपत्तीची माहिती घेतली. बाजारपेठेतील दुकानदारांशी खासदार नारायण राणे यांनी चर्चा करुन तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या.
यावेळी खासदार नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रशासनाला नुकसान भरपाईच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यसरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले. तसेच भविष्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नियोजन करून येणाऱ्या वर्षात मे महिन्याच्या आधी नदीचा गाळ काढला जाईल. तसेच कोणत्याही सूचना न देता सोडण्यात येणारं धरणाच पाणी सूचना केल्याशिवाय सोडू नये यासाठी संबंधितांना सूचना केल्या जातील. तसेच बंधाऱ्यासाठी प्रयत्न करून येणाऱ्या वर्षात ते पूर्ण करून घेऊ असे आश्वासन खारेपाटण वासीयांना खासदार नारायण राणे यांनी दिले.
यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दिक्षांत देशपांडे, माजी जीप सदस्य बाळा जठार, सूर्यकांत भालेकर,खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर, उपसरपंच महेंद्र गुरव व ग्रामपंचायत सदस्य, धनश्री ढेकणे, मनाली होनाळे, किरण करले, क्षितिजा धुमाळे, दक्षता सुतार, अमिषा गुरव, जयदीप देसाई
,व्यापारी असोसिएशन अध्यक्ष प्राजल कुबल, सूर्यकांत भालेकर,सुधीर कुबल, राजू वरूनकर, शेखर शिंदे, शेखर कांबळी, उज्वला चिके, अविनाश गाठे, पिंटू सर्पे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नुकसान ग्रस्तांचे
मेडिकल, आसिफ मनाजी,
तळगावकर स्टेशनरी – संतोष तळगावकर, पान स्टॉल – अनंतराव गांधी, पद्मावती हार्डवेअर – केतन आलते, विष्णू मंदिर, पवित्र कावळे यांच्या घराचे नुकसान झाले त्याची खासदार नारायण राणे यांनी पाहणी केली.इतर नुकसानग्रस्तांनचें तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले.
______________________________
*संवाद मीडिया*
🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
*७ वर्ष ७लाख कार्स..*
*७ लाख समाधानी कुटुंब*
🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
🏆सेलिब्रेशन ऑफर्स🏆
👨👩👧👧 *जॅायफुल जुलै* 👨👩👦👦
₹.1️⃣0️⃣0️⃣0️⃣0️⃣0️⃣
पर्यन्त चे डिस्काउंट्स
✅सेफ्टी , परफ़ॉर्मन्स , फ़ीचर्स
आता सगळं काही एकाच कार मध्ये
❤️❤️ *टाटा नैक्सोन* ❤️❤️
आता सर्व काही एकत्र ते देखिल
✅केवळ *७.९९ लाख* पासुन ( स्वागत मूल्य)
भारताची सर्वाधिक विकली जाणारी एस.यु.वी. आणि
✅*५ स्टार सेफ्टी* रेटिंग मानांकित या श्रेणी मध्ये एकमेव कार
*On the spot exchange*
💯% on road finance
🇮🇳🇮🇳*संपुर्ण स्वदेशी अभियान*🇮🇳🇮🇳
त्वरा करा.. आजच भेट दया अथवा कॅाल करा
*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली | ओरस
*7377-959595*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*