You are currently viewing सावंतवाडी तालुक्यातील कंटेन्मेंट झोन

सावंतवाडी तालुक्यातील कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी 

सावंतवाडी तालुक्यात 23 ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. सदर कंटेन्मेंट झोन पुढील प्रमाणे आहेत. सावंतवाडी शहरात खासकीलवाडा कल्पना रेसिडेन्सी, लेक पॅलेस दुसरा मजला 202 व 203 सदनिका, जाग कॉम्पलेक्स, सिक्वेरा अवाट, भटवाडी, सबनीसवाडा येथे दिनांक 9 मे 2021 पर्यंत, खासकीलवाडा – राणे पाणंद, ओम अपार्टमेंट येथे 10 मे 2021 रोजी पर्यंत व खासकीलवाडा आरेकर चाळ येथे 11 मे 2021 रोजी पर्यंत, तर बांदा – काळसेवाडी येथे तीन ठिकाणी, बांदा – मोर्येवाडी, सावरवाड – परबटेंब, साटेली – कातवडवाडी, सातोसे – आजेवाडी येथे दि 7 मे 2021 रोजी पर्यंत, मडुरे – रोनापाल येथे 3 मे 2021 रोजी पर्यंत, बांदा – काळसेवाडी, शेर्ले – आरोसबाग येथे 9 मे 2021 रोजी पर्यंत, कलंबिस्त – घनशेळवाडी, कारिवडे – भैरववाडी  येथे दि. 5 मे 2021 रोजी पर्यंत, मळेवाड – देऊळवाडी येथे 6 मे 2021 रोजी पर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आले आहेत.

सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. सदर आदेश अत्यावश्यक सेवा जसे सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था इ. वितरीत करणारे, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या वाहनांना लागू असणार नाहीत. या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध  आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 व 58, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 71,139 आणि भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =