*सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपच प्रबळ दावेदार*
*राजन तेली व संजू परब यांच्या उपस्थितीत भाजपा कार्यकारणीचा ठराव*
*प्रदेश युवा उपाध्यक्ष विशाल परब यांची अनुपस्थिती*
सावंतवाडी
सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून भाजपलाच उमेदवारी मिळावी, असा ठराव सावंतवाडी भाजपा कार्यकारणीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील स्वायत्त संस्थांमधील सर्वाधिक सत्ता केंद्र ही भाजपचीच आहेत. त्यामुळे महायुतीचा उमेदवार हा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपचाच असावा, असा मतप्रवाह भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत होता.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सरचिटणीस, सर्व मंडल अध्यक्ष तसेच भाजपचे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक सावंतवाडी शहरातील भाजपा कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.
विशेष म्हणजे या बैठकीस स्थानिक उमेदवारच हवा, पर्यटक नको, आपण सावंतवाडी विधानसभा लढणार असे जाहीर करणारे सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब आवर्जून उपस्थित होते. सामाजिक कार्याच्या माध्यमातून मतदार संघात लोकांपर्यंत पोहोचणारे भाजपाचे प्रदेश युवा उपाध्यक्ष विशाल परब यांची अनुपस्थिती होती.
या बैठकीत सावंतवाडी मतदार संघ हा आगामी विधानसभा निवडणूकीसाठी भाजपला मिळावा,हा ठराव सर्वानूमते मंजूर करण्यात आला.
बैठकीस जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, माजी नगरसेवक तथा जिल्हा निमंत्रित सदस्य मनोज नाईक, माजी जि. प. उपाध्यक्ष तथा जिल्हा चिटणीस एकनाथ नाडकर्णी, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक तथा आंबोली मंडल अध्यक्ष रविंद्र मडगावकर, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे , बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, वेंगुर्ला मंडल अध्यक्ष सुहास गवंडळकर, दोडामार्ग मंडल अध्यक्ष सुधीर दळवी, माजी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पप्पू परब, निरवडे गावचे माजी सरपंच प्रमोद गावडे आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थितीत होते.
______________________________
*संवाद मिडिया* Advt
🤵♀🤵♂👩⚖️🧑⚖️🤵♀🤵♂👩⚖️🧑⚖️🤵♀🤵♂
*प्रवेश सुरू.. प्रवेश.. सुरू… प्रवेश सुरु! 2024-2025*
*१०वी – १२वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पस
*भोसले नॉलेज सिटी* येथे
*👉१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️सिव्हील इंजिनिअरिंग
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
https://sanwadmedia.com/138036/
*👉१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग
*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय
https://www.ybit.ac.in
*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲9404272566*
*डिग्री :*
*📲 9604272566*
*👉१२ वी नंतर डिग्री/डिप्लोमा फार्मसीला प्रवेश सुरु!*
▪️डी.फार्म
▪️बी.फार्म
▪️एम.फार्म
*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व नॅक मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज
www.sybespharmacy.com
*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲8600380717*
*डिग्री:*
*📲8275651704*
*भोसले नॉलेज सिटी*
*चराठे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
www.bkcedu.com
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*