नव्याने समावेश झालेल्या एकविध खेळ संघटनेची 11 जुलैला बैठक
सिंधुदुर्गनगरी
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन 2024-25 चे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात नव्याने समावेश झालेल्या एकविध खेळ संघटनेची बैठक जुलै 11रोजी सायं.4 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, सिधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा एकविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2024-25 या सत्रातील जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन व नियोजन करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील खालील नव्याने समावेश झालेल्या खेळ प्रकारातील अधिकृत राज्य संघटनेशी संलग्न जिल्हा एकविध खेळ संघटनांचे अध्यक्ष/सचिव यांची बैठक जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
या बैठकीस उपस्थित राहतांना अधिकृत राज्य संघटनेला संलग्न असल्याचे पत्र तसेच वेळापत्रक सोबत आणावे असे जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी कळविलेले आहे. बेल्ट रेसलींग, सिलंबम, लगोरी, टेनिस क्रिकेट, हुपक्वॉन दो, पेन्टाक्यू,चॉयक्वांदो, स्पीडबॉल, सुपर सेव्हन क्रीकेट, कुराश, टार्गेटबॉल, टेबल सॉकर, ग्रॅपलिंग, चॉकबॉल, टेनिस बॉल क्रिकेट, रोप स्किपींग, थांग ता मार्शल आर्ट, बीच व्हॉलीबॉल, कॉर्फबॉल, ड्रॉप रोबॉल, स्पोर्ट डान्स, मीनी गोल्फ, हाफकिडो बॉक्सींग, मॉन्टेक्स बॉल क्रिकेट, थायबॉक्सींग, टेनिस व्हॉलीबॉल, पॉवरलिफ्टींग ,फुटसल, वोवीनाम, जंपरोप, फिल्ड आर्चरी, वूडबॉल, रस्सीखेच, जित कुने दो, युग मुन दो, लंगडी, म्युजिकल चेअर, युनिफाईट, आष्टे-डु-आखाडा, फ्लोअरबॉल, फुटबॉल टेनिस, बुडो, कुडो, टेंग-सु-डो. वरील खेळ प्रकारातील संबंधित खेळाच्या संघटनानी याची नोंद घ्यावी.