*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पार*
वृत्त – वनहरिणी
(मात्रा -८,८,८,८)
हृदयामध्ये साठवलेली घुसमट सगळी काढून टाक
गोंधळलेल्या अविचारांचा सारा गुंता उसवून टाक…
संसाराचा डाव मांडला नकोच हेका हट्ट बावळा
उगा मनाला सतावणारी अढी आतली मोडून टाक….
सांगितले मी एक स्वतःला नीट जपावे अस्तित्वाला*
मुक्त मनाने पावलातल्या बंधन बेड्या तोडून टाक….
आशंकेला नकोच जागा कल्लोळ नको संदेहाचा
स्वच्छ शुद्ध त्या प्रेमाचा अन् बंध मनाचा जोडून टाक..
खूपच झाले खपणे आता परस्परांना जपुया सारे
कष्ट पुरे.. विश्रांतीसाठी पार एक तू बांधून टाक…
राधिका भांडारकर