You are currently viewing सावंतवाडी येथे 11 ते 15 जुलै संयुक्त योगोपचार शिबिराचे आयोजन 

सावंतवाडी येथे 11 ते 15 जुलै संयुक्त योगोपचार शिबिराचे आयोजन 

*सावंतवाडी येथे 11 ते 15 जुलै संयुक्त योगोपचार शिबिराचे आयोजन

सावंतवाडी

पतंजली योग समिती सिंधुदुर्ग मार्फत सावंतवाडी शहरामध्ये *संयुक्त योगोपचार शिबिर* गुरुवार दिनांक 11 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 दरम्यान होत आहे. सकाळी 5:30 ते 7:30 या वेळेत दररोज 5 दिवशीय शिबिर संपन्न होणार आहे .

सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासन, ऍडव्हान्स योग, आयुर्वेद तसेच योगोपचार आणि आध्यात्मिक उन्नती बाबत विशेष वर्ग होतील. या शिबिरात मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, सांधेदुखी, हृदयविकार या व्याधींच्या निवारणासाठी विशेष मार्गदर्शन दिले जाईल. वैश्य भवन, गवळीतिठा, सावंतवाडी येथे सदर शिबिर होणार आहे.
तरी सर्व योगाभ्यास प्रेमी पुरुष, महिला तसेच लहान मुलांनी या योगशिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी शेखर बांदेकर 9823881712, तुळशीराम रावराणे 7083602504, महेश भाट 9975543446 , दत्तात्रय निखार्गे 9420306869 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा