*मुंबई गोवा महामार्गाचे पावसात वाजले बारा
*पावसाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षरशः थोबाड फोडले, या दुरावस्थेला जबाबदार कोण?*
*जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांचा सवाल*
मुंबई गोवा महामार्गाचे गेली तेरा वर्षे काम सूरू आहे. बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. हजारो कोटी रुपायांचा खर्च या महामार्गावर करण्यात आला आहे. दरवर्षीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी होत असते त्यामुळे यावर्षीच जास्त पाऊस पडला असे म्हणता येणार नाही. जर दरवर्षीच अशा प्रकारचा पाऊस जिल्ह्यात होत असेल तर महामार्गावर पाणी येणार नाही अशा पद्धतीने महामार्गाचा आराखडा बनवून त्या पद्धतीने महामार्गाचे बांधकाम का करण्यात आले नाही? महामार्गाच्या बांधकामामुळे महामार्गच्या लगत पूरसदृश्य परिस्थीती निर्माण होऊन स्थानिकांना त्याचा त्रास होत असेल तर त्याला जबाबदार कोण? महामार्गाचे चौपदरीकरण होत असताना यशाचे श्रेय घेणारे आता याचे पण श्रेय घेणार आहेत का असा सवाल सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी उपस्थित केला आहे. महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य नियोजन नाही. अनेक ठिकाणी सर्विस रोड योग्य पद्धतीने केलेले नाहीत. या निकृष्ट कामाची चौकशी होऊन दोषींवर जबाबदारी निश्चित करून कारवाई होणार का? असा सवाल सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केला आहे.
______________________________
*संवाद मिडिया* Advt
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙼𝚊𝚔𝚎 𝚢𝚘𝚞𝚛 𝙿𝚊𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝚈𝚘𝚞𝚛 𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗…*
*𝙲𝚊𝚛𝚎𝚎𝚛 𝚒𝚗 𝙵𝚊𝚜𝚑𝚒𝚘𝚗 𝙳𝚎𝚜𝚒𝚐𝚗𝚒𝚗𝚐…*
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*
(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
🔸कालावधी :- २ वर्षे
🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-कोणत्याही शाखेची १२ वी परीक्षा उत्तीर्ण.
🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.
*संपर्क:*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,
अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:
📱 74998 21369
कृपया पुढील Google form भरावा :
https://forms.gle/k5HygsNxeUTTMJmb7
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*