नभांगणी शरदाचे चांदणे सांडायला लागले.
तारकांचे चंद्राबरोबर खेळ रंगायला लागले.
अवखळ वारे थंडगार होऊ लागले.
पानगळतीच्या दु,खात तरू निस्तेज झाले.
कंठ गोठलेले पक्षीगण नि,शब्द झाले .
दंवाची झालर आसमंतात पसरली.
पानापानाआड कळ्या फुले दडू लागली.
पूर्वा लवकर रंगेना रात्र आळसावली.
लाल बाळरविबिंब क्षितिजाआड लपू लागले .
तिमिर झाला हट्टी हटता हटेना
झोपेत गुरफटली स्रुष्टी जागता जागेना
क्षणात पूर्वा गुलाबी रंगत ऊजळली.
तिच्या सवे पक्षीगण मधुरस्वरात गायले .
तेजोनिधी सुवर्णकण ऊधळत आला
चराचर सोनेरी करू लागला
ठायी ठायी आभाळमाया सांडू लागली.
नभांगणी हंसरी सुप्रभात झाली.
……………..।।….