You are currently viewing सिंधुदुर्गचा ऐश्वर्य मांजरेकर बनला ग्रीन योद्धा..

सिंधुदुर्गचा ऐश्वर्य मांजरेकर बनला ग्रीन योद्धा..

सिंधुदुर्ग :

युनीसेफ महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र युथ फॉर क्लायमेट ॲक्शन, महाराष्ट्र शासन, Center for Environment Education, We Naturalist, citizen Association for child Rights, यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रीन योद्धा कार्यशाळा पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील वातावरणीय बदलावर काम करणाऱ्या ठराविक युवकांची निवड ग्रीन योद्धा कार्यशाळेसाठी करण्यात आली होती. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील युवा सामाजिक कार्यकर्ता पर्यावरण संवर्धक युवक ऐश्वर्य मांजरेकर हे ग्रीन योद्धा म्हणून यापुढे जिल्ह्यामध्ये काम करणार आहेत. तसेच त्यांनी याआधी सुद्धा शासनाच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवून वातावरण बदल, वृक्षारोपण, जलजागरण अभियान, सिंगल युज प्लास्टिक बंदी, शहरी व सागरी किनारा स्वच्छ्ता अभियान, माती संवर्धन, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी उपक्रम राबवून त्यांनी योगदान दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा