You are currently viewing ‘व्हाईस ऑफ मीडियाच्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाला मंत्री केसरकर,विशाल परब,राजन तेली एकाच मंचावर.

‘व्हाईस ऑफ मीडियाच्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाला मंत्री केसरकर,विशाल परब,राजन तेली एकाच मंचावर.

‘व्हाईस ऑफ मीडियाच्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाला मंत्री केसरकर,विशाल परब,राजन तेली एकाच मंचावर…

सावंतवाडी

सावंतवाडी येथे नगर पंचायत हाॅल येथे व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग वतीने गुणगौरव कौतुक सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री ‌ दीपकभाई केसरकर, भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब माजी आमदार राजन तेली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे परब, एकाच मंचावर उपस्थित पाहायला मिळाले. मान्यवरांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांच्या पाल्यांचे गुणवंत विद्यार्थ्यांचे सन्मान करण्यात आले तसेच महिला बचत गटांचा देखील सन्मान यावेळी करण्यात आला, दिनेश गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन यावेळी केले.

व्हॉईस ऑफ मिडियाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष परेश राऊत, कार्याध्यक्ष समीर महाडेश्वर, उपाध्यक्ष मिलिंद धुरी, उपाध्यक्ष विष्णू धावडे, उपाध्यक्ष भूषण सावंत, सह. सचिव संजय पिळणकर, खजिनदार शैलेश मयेकर, संघटक आनंद कांडरकर, नागेश दुखंडे, सह खजिनदार वासुदेव गावडे, सुयोग पंडित, राजेश हेदळकर, चिन्मय घोगळे, सुमित दळवी, प्रथमेश गवस, शंकर जाधव उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा