You are currently viewing नरेंद्र डोंगर येथे वन विभाग कर्मचारी ड्युटी बजावत असताना चौकीवर झाड कोसळून आत असलेला कर्मचारी गंभीर जखमी

नरेंद्र डोंगर येथे वन विभाग कर्मचारी ड्युटी बजावत असताना चौकीवर झाड कोसळून आत असलेला कर्मचारी गंभीर जखमी

नरेंद्र डोंगर येथे वन विभाग कर्मचारी ड्युटी बजावत असताना चौकीवर झाड कोसळून आत असलेला कर्मचारी गंभीर जखमी

सावंतवाडी

आज झालेल्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडी शहरा सर्वत्रच पाणी पाणी झालं होत. त्यातच नरेंद्र डोंगर येथे ड्युटी बजावत असणारा माजी सैनिक विद्याधर सावंत यांच्या चौकीवर झाड पडून आत असलेले सावंत हे कर्मचारी गंभीर जखमी झाले. ही घटना दुपारी एकच्या दरम्यान घडली. सदर कर्मचारी हा माजी सैनिक आहे. रक्ता रक्तबंबाळ अवस्थेमध्ये चौकीमध्ये अडकलेला असतानाच त्यांनी आपला सहकारी अशोक गावडे यांना फोन करून सदर घटनेची कल्पना दिली असता अशोक गावडे तेथे तात्काळ धाव घेतली व सावंत यांना चौकीमधून बाहेर काढले व आपला सहकारी उत्तम कदम यांच्या मदतीने सावंत यांना सावंतवाडी कुटीर रुग्णालयामध्ये दाखल केले . विद्याधर सावंत यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे त्यांच्यावर कुटीर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या मदत कार्यासाठी सामाजिक बांधिलकी रवी जाधव यांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा