*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गुलाबस्तवन…*
…त्रेचाळीसावे..!!
फुलण्याआधीचं कुपीत तुला
ईश्वराने रंगात बुडविले
पवित्र कोवळ्या कळ्यांना
रंगलावण्याने अलंकृत केले..
स्वर उठता अरूणोदयी
विश्वेश्वराचे आगमन झाले
रंगसौंदर्य दाखवून भास्करास
उगवण्यास भाग पाडले..
तुझ्या ईश्वरी रूपानं
जगण्याचं सोन व्हावं
फुललं तुझंमाझं नात
ईश्वरासोबत अंगणात फुलावं..
कधीच मागितलं नव्हतं
ईश्वराने अंगणात यावं
रूपात तुझ्या देवलाभला
गाभा-यात सदा राहावं..
मनअंगणी डोळे पाणावले
डोळेटिपून काव्यात गुंफले
आठवाच्या कुपीत तुझे
गंध दाटून आले….
बाबा ठाकूर धन्यवाद
गुलाबस्तवनाच्या रूपाने आपल्या
ओळी काव्यरूपात अनेक भाषेत
अनुवादित होऊन देशभर पोचतात!
गुलाबप्रेमींचे धन्यवाद…!!