You are currently viewing महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ एसटी स्टँड वर येणाऱ्या लोकांना उघड्यावर पडू देणार नाही

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ एसटी स्टँड वर येणाऱ्या लोकांना उघड्यावर पडू देणार नाही

कुडाळ

अर्धवट बांधकाम करून लोकार्पण केलेल्या कुडाळ एसटी स्टँड मध्ये येणाऱ्या स्थानिक तसेच परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांचे आज जे हाल होत आहेत, त्याच्यावर जर योग्य उपाय केले गेले नाहीत तर त्याची गंभीर दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेना घेणार असून लवकरच उरलेले काम हे प्रतिष्ठित लोकांकडून वर्गणी गोळा करून करणार. तसेच सदर स्टॅन्ड मध्ये जो काही भ्रष्टाचार झाला आहे, त्याचा पर्दाफाश करून एस टी प्रशासनावर पी एल आय (जनहित याचिका) दाखल करणार असल्याचे म.न.रा.प.का.से. चे अध्यक्ष जे.डी. उर्फ बनी नाडकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × one =