You are currently viewing काव्यपुष्प – ५३ वे

काव्यपुष्प – ५३ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित श्री गजानन विजय काव्यांजली*

 

*काव्यपुष्प – ५३ वे*

—————————————-

सालाबादप्रमाणे आरंभ झाला । बाळापुरी उत्सवाला ।

भक्त येती कीर्तन-भजनाला । बुवांच्या घराला ।। १ ।।

 

नऊ दिवस कार्यक्रम झाले । ग्रामस्थानी साह्य केले ।

वर्गणी-पैसे जमवले । बाळकृष्ण बुवासाठी ।।।२ ।।

 

दिवस नववा उजाडला । तो अद्भुत प्रकार घडला ।

दोन प्रहार समयाला । गजानन आले बाळापुरा ।। ३ ।।

 

लोक सारे आनंदले । बुवास म्हणू लागले । बघा,

स्वामी गजानन आले । तुमच्या उत्सवाला ।। ४ ।।

 

बुवा म्हणे, हे छान झाले । स्वामी गजानन माझ्या घरी आले।

परी, आजच्या दिनी समर्थ रामदास। कसे नाही आले ? ।।५।।

 

मज रामदास बोलले। उत्सवास बाळापुरी येईन भले ।

अजून कसे नाही आले ? । समर्थ माझ्या घरी ।। ६ ।।

*******

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास ।।

—————————————–

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ५३ वे

अध्याय – ९ वा , कविता -५ वी

-अरुण वि.देशपांडे – पुणे

——————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा