दुसऱ्या महायुध्दाचे अनुदान घेत असलेल्या लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले जमा करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
दुसऱ्या महायुद्धाचे अनुदान घेत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हातील माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांनी त्यांचे हयातीचे दाखले २५ मे २०२४ पर्यत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
लाभार्थ्यानी आपण हयात असल्याबाबतचा दाखल्यावर स्वतःचा फोटो व संपर्क क्रमांक सबंधित बँककडून अथवा ग्रामसेवक/नगरसेवक यांचे स्वाक्षरी घेवून या कार्यालयात जमा करावी. जे लाभार्थी दुर्गम भागात राहतात अशा लाभार्थ्यानी सदर हयातीच्या दाखल्याची पूर्तता करण्यासाठी आपल्या नातेवाईकांची मदत घ्यावी. तसेच जे लाभार्थी मयत झालेले आहेत त्यांचे मृत्यू दाखले त्यांच्या वारसदारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे जमा करावे. जेणेकरून त्यांचे पुढील अनुदान बंद करण्यास सुलभ होईल याची नोंद घ्यावी. लाभार्थी यांना कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांनी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक- ०२३६२-२२८८२० अथवा मोबा.नं. ७०२१४५०१८१ वर संपर्क करावा.
हयातीचे दाखले २५ मे २०२४ पर्यत जमा न केल्यास अशा लाभार्थ्याचे अनुदान बंद करणेत येईल. हयातीचे दाखले वेळेत सादर न केल्यामुळे आपले अनुदान बंद झाल्यास त्यास लाभार्थी स्वतः जबाबदार राहील याची नोंद घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.