*ज्येष्ठ साहित्यिका, चित्रकार स्वप्नगंधा आंबेतकर लिखित अप्रतिम लेख*
*लाडका भाऊ योजना सुरू होणार..?*
नंतर
लाडक्या मुली
नंतर लाडकी मुले
लाडकी बायको
लाडका नवरा
अशा सर्व योजना सुरु होणार आहेत.
तरी तूर्त कोणालाही नोकरी मिळविण्यासाठी शिक्षण घेण्याची गरज भासणार नाही.
नोकरीसाठी धडपड करावी लागणार नाही.
मस्त लाडावलेल्या लोकांनी खुशाल खावे, प्यावे, मजा करावी
कारण ते आपोआपच पोसले जाणार आहेत.
हा पैसा कुठून येणार ते विचारु नका.
लठ्ठ पगारातून इन्कम टॅक्स कापला जातो, इमाने इतबारे, कर न बुडविणारे कर भरत राहणार, अरे पण आधी जास्त पगार देऊन तो परत मागून कां घेता?
त्यापेक्षा योग्यते प्रमाणेच पगार देऊन लोकांना सुखाने जगू द्या ना.
या वेगवेगळ्या योजना राबविण्यापेक्षा आणि भीकेची सवय लावण्यापेक्षा प्रत्येक गरजवंताला काही काम द्या. भिकारी समाज बंद करा. प्रत्येकाला स्वतः चे पोट भरण्याची, काम करण्याची, स्वतः तील गुण ओळखण्याची संधी द्या, त्यासाठी काही योजना राबवा. कोणीही व्यक्ती निरक्षर राहणार नाही, कोणीही उपाशी राहणार नाही अशी काहीतरी तजवीज करा की कोणीही लाचार राहणार नाही.
स्वतः च्या बुद्धी कौशल्यावर स्वतः ला उभे राहण्याची संधी द्या.
शिक्षण, नोकरी यासाठी लाच देणेघेणे, आमिषे दाखविणे बंद करा.
आजपर्यंत ज्या लोकांना नोकरी धंदा मिळाला ते ठीक, पण आणखी दहा वर्षांनी तुमच्या मुलाबाळांना नोकरी मिळेल की नाही याची काय गॅरंटी, शिक्षण घेऊन सुद्धा कितीतरी लोक नोकरीसाठी वणवण भटकतात, तर नोकरी नसलेली, शिक्षण नसलेली बेकार तरुण, तरुणी अस्वस्थ झाली आहेत, बेफिकिर झाली आहेत, त्यांना त्यांचे सुंदर जीवन जगण्यासाठी वेगवेगळ्या सत्कार्याच्या योजना तयार करा.
आज ज्यांच्याकडे पैसा आहे ते वाटेल तसे उधळत आहेत, ज्यांच्याकडे काहीच नाही ते कष्ट करीत आहेत किंवा नको त्या मार्गाकडे वळत आहेत त्यांना आवर घाला आणि कुठेतरी स्वावलंबी बनवा.
आता एक नवीन योजना सुरु करा.
प्रत्येक तरुण पिढीतील मुलामुलींना योग्य शिक्षण, पोटापाण्याच्या व्यवसाय मिळावा. आपल्या देशातील भिकारी व चोर्यामार्या करणार्या लोकांना त्यांच्या या प्रवृत्ती पासून दूर कसे करता येईल त्या योजना राबवा. राज्यात कोणीही अशिक्षित व उपाशी राहू नये, आजारी होऊ नये यासाठी आरोग्यदायी योजना निघाल्या तर कुठे ना कुठे तरी बेकार लोकांची कुचंबणा थांबेल आता रस्तोरस्ती गाड्यांवर वडापाव, चायनिज खाद्यपदार्थ हे ते मिळते, रिक्षा, वाहने याची माणसांपेक्षा जास्त गर्दी, बेकारी वाढते म्हणून कोणी ही कोणताही धंदा करतो.
परंतु या सर्वात कुठेही शिस्त नाही, रस्त्यावर चालताही येत नाही, प्रश्न कसेही निर्माण होतात, जर सर्वंच सुरळित असते तर ही वेळ च आली नसती.
मूळ मुद्दा हा आहे की,ज्या कांही योजना असतील त्या सर्व सुस्थापित, सुव्यवस्थेसाठी सर्व जनतेसाठी, हितासाठी असाव्यात.
आता सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न आहे की,पुढील पिढीतील तरुणांनी बेकार राहू नये यासाठी कांही लाडक्या योजना असाव्यात.
खूप विचार करुनच हा मुद्दा लक्षात आला म्हणून लिहिले.
🌷🌷🌷🌷🌷🌷