नाशिक इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिवलमध्ये राजा लघुपट प्रथम
दिग्दर्शक संतोष बांदेकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
सावंतवाडी
नाशिक इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिवलमध्ये कोकणच्या दशावतारी राजाचा जिवनपट उलगडणारा सुप्रसिद्ध दिग्दर्शक संतोष बांदेकर दिग्दर्शित राजा हा लघुपट प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे. काहूर द्वितीय तर प्राॅन्स हा लघुपट तॄतीय ठरला आहे. दुर्गाज लाकडा ऊन या लघुपटाला बेस्ट जुरी अवॉर्ड तर दरमजल व सुंदरी या लघुपटांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. याच बरोबर राजा लघुपटाच्या शिरपेचात दुहेरी सन्मानाचा तुरा खोवला गेला असून सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून राजा लघुपटाचे दिग्दर्शक संतोष बांदेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
याचबरोबर सर्वोत्कृष्ट लेखन प्राॅन्स -स्वप्नील शेटये, सर्वोत्कृष्ट संगीत – बाईची जात , सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – जया, सर्वोत्कृष्ट संकलन – सुंदरी याचबरोबर सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष डाॅ. सोमनाथ मुटकुळे -राहत, सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री चैताली जावकर – सॅल्यूट तर सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून आर्यन पाटील चित्रकार यांना जाहीर करण्यात आले आहेत.
या शॉर्टफिल्म फेस्टीवलसाठी परिक्षक म्हणून शाम शिंदे आणि किरण मोरे यांनी काम पाहिले. फेस्टीवलचे आयोजक अतुल महानवर, योगेश गोसावी, अनिता पाटील यांनी अतिशय उत्तमरित्या आयोजन पार पडावे यासाठी मेहनत घेतली.
“राजा” मध्ये किशोर वाळके, बाळा परब, नंदु वाळके, नारायण लाड,शंकर वाळके, किशोर सरनोबत, सुनिल कदम, केतन गोठोस्कर, दिपक वाळके, दशावतारी कलाकार मामा तेजम आणि मध्यवर्ती भूमिका जिल्ह्यातील प्रथितयश अभिनेत्री कल्पना बांदेकर यांनी साकारली आहे. लेखन दिग्दर्शन संतोष बांदेकर, तर संकलन, छायाचित्रण आणि स़गीत ह्या बाजू सागर बांदेकर आणि पुंडलिक सुद यांनी सांभाळल्या आहेत. या लघुपटाच्या निमित्ताने कोकणचा निसर्ग, कोकणच्या लाल मातितील उपजत कलाकार आणि रात्रीचे राजा असलेल्या दशावतारी कलाकारांची व्यथा जागतिक स्तरावर परिणामकारकरित्या मांडण्यात आले आहेत. चित्रिकरणासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही सोई सुविधा उपलब्ध नसताना स्थानिक उपलब्ध साधनांचा वापर करुन गोठोस गाव आणि परीसरामध्ये राजाचं चित्रिकरण पुर्ण करण्यात आलं. केवळ मोलमजुरी करणारे आणि हातावरच्या पोटावर जगणारे हे कलाकार ह्या यशांने प्रचंड आनंदी झाले असून या यशाबद्दल दिग्दर्शक संतोष बांदेकर यांच्यासह राजाच्या संपूर्ण टीमचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.