कुडाळ :
कुडाळ रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. दोनवर ६५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह गुरुवारी सकाळी साडेनऊ साडेनऊ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास झाला. या मृतदेहाची ओळख सायंकाळी उशिरापर्यंत पटली नव्हती. याबाबतची खबर रेल्वे पोलीस प्रदीप रामवतार कुमार यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. गुरुवारी सकाळी रेल्वे पोलीस प्रदीप रामवतार कुमार कणकवली रेल्वेस्थानक येथे आपल्या ड्युटीवर आले. त्यानंतर सकाळी साडेनऊ
वाजण्याच्या सुमारास कुडाळ रेल्वेस्थानक मास्तर यांनी दूरध्वनीवरून त्यांना कुडाळ रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. दोनवर एक वृद्ध व्यक्ती झोपलेली असल्याचे सांगितले. त्यानंतर लागलीच प्रदीप कुमार येथील रेल्वेस्थानकावर आले.
त्यांनी पाहणी केली असता, ती व्यक्ती हालचाल करीत नव्हती. नंतर १०८ रुग्णवाहिका बोलविण्यात आली. त्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून ती व्यक्ती मृत झाल्याचे सांगितले. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली. हवालदार अनिल पाटील व स्वप्नील चव्हाण यांनी पंचनामा केला.