कुडाळ तालुक्यात सीएम माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ…
मुळदे ग्राम पंचायतीत मार्गदर्शन शिबीर:तहसीलदार वीरसिंग वसावे य यांचा पुढाकार..
कुडाळ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजना पासून कोणीही वंचित राहू नये यासाठी शासनाने अतिशय सुटसुटीत आणि सहज उपलब्ध असे कागदपत्र उपलब्ध केले आहेत त्याचा लाभ सर्व लाभार्थ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी आज मुळदे येथे केले .कुडाळ तालुक्यात ही योजना राबवणारी मुळदे ग्रामपंचायत पहिली ठरली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ग्रामपंचायत मुळदे व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती मुळदे यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गावात प्रभावी राबवून महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी विविध अर्ज व त्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र याविषयीचे मार्गदर्शन शिबिर आज ग्रामपंचायतच्या सभागृहात तहसीलदार श्री वसावे गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
.यावेळी सरपंच सध्या मुळदेकर, उमेद अधिकारी गणेश राठोड, उपसरपंच अपूर्वा पालव, हिर्लोक मुख्य सेविका श्रीमती मंगल सुतार ,प्रभारी तलाठी सौ विद्या अरदकर, पोलीस पाटील रामदास चव्हाण, ग्रामविकास अधिकारी गोविंद तोरस्कर , सुशांत कदम, रूपाली चव्हाण, संतोषी चव्हाण ,ओंकार केसरकर, वैशाली पालव ,योगिता माळकर, प्रवीण पालव, बाबूराव जाधव, अमित पालव ,मंगल म्हापणकर, सुहास जाधव, नागेश पालव, स्वप्नील म्हापणकर ,संतोष जाधव, लक्ष्मण पालव ,दीपिका पालव ,ममता पालव, प्रिया पालव, आरती पालव ,शमिका पालव ,अनिल मासंग ,उन्नती परब, नम्रता जाधव ,लीला जाधव, पुंडलिक जाधव ,प्रमिला गवई, साबाजी पालव ,भिकाजी पालव ,साक्षी पालव, श्रुतिका मेस्त्री, निखिल पवार ,राखी माधव, स्वप्नील पालव ,दत्तप्रसाद तवटे,आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी बोलताना तहसीलदार वसावे म्हणाले ,कुडाळ तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवणारी मुळदे हि पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. शासन निर्णय झाला. त्या पहिल्या निकषांमध्ये बदल झाल्यामुळे आता जमीन मर्यादा, वय अधिवास ,या गोष्टी सादर कराव्या लागणार नाहीत. शासनाच्या नवीन सूचनेनुसार जे काही कागद आवश्यक कागदपत्र आहेत, ते आपल्या घरच्या घरीच उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही ,याबाबत शासनाने योग्य ती दखल घेतलेली आहे .या योजनेचा कालावधी ऑगस्ट अखेरपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा. आशा सेविका माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाली पाहिजे यासाठी शासनाच्या या उपक्रमास सुरुवात होत असल्याचे वसावे यांनी सांगितले
गटविकास अधिकारी श्री जगताप यांनी या योजनेचा प्रचार ,प्रसार सगळीकडे मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. कुडाळ तालुक्यात 68 ग्रामपंचायती असून महिलांनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा कागदपत्रे सहज सोपी असल्याने हा प्रश्न निश्चितच मार्गी लागणार आहे .तसेच नारी अँप चा वापर करून आपण ऑनलाईन ही प्रक्रिया करू शकत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलिस पाटील रामदास चव्हाण यांनी दुपारपर्यंत सुमारे दिडशेहुन अधिक महिलांना योजनेच्या मोफत फॉर्मचे वाटप करण्यात आले असे सांगितले. उपस्थित मान्यवरांचा ग्रामपंचायतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील श्री चव्हाण, तर आभार ग्रामविकास अधिकारी गोविंद तोरस्कर यांनी मानले.