You are currently viewing आमदार परशुराम उपरकर यांची उपप्रादेशिक अधिकारी परिवहन यांच्या कार्यालयात समर्थकांसह धडक

आमदार परशुराम उपरकर यांची उपप्रादेशिक अधिकारी परिवहन यांच्या कार्यालयात समर्थकांसह धडक

आमदार परशुराम उपरकर यांची उपप्रादेशिक अधिकारी परिवहन यांच्या कार्यालयात समर्थकांसह धडक

परिवहन कार्यालयाकडून उचित कारवाई न झाल्यास 5 ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन छेडणार

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उपप्रादेशिक अधिकारी परिवहन यांच्या कार्यालयात आज समर्थकांसह धडक देत घेराव घातला. यावेळी उपप्रादेशिक अधिकारी श्री विजय काळे यांना विविध प्रश्नांची सरबत्ती केली. मे महिन्यापासून आपल्या कार्यालयात दोन बैठका होऊन बैठकीमध्ये मांडलेल्या मुद्द्यांबाबत परिवहन कार्यालयाकडून कारवाई होत नसल्याने 5 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता आपल्या कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा माजी आमदार श्री उपरकर यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विजय काळे यांना दिला यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा उपरकर समर्थक आशिष सुभेदार आप्पा मांजरेकर राजेश टंगसाळी सिंधुदुर्ग ड्रायव्हर असोसिएशनचे अध्यक्ष विजय जांभळे आबा चिपकर मंदार नाईक संदेश सावंत संतोष सावंत गिरगोल दिया प्रमोद गावडे शाईबाज रसांगी भक्तीश कावळे हेमंत कांबळी,सिध्देश भट,अभय मयेकर, देविदास सातारडेकर अशपाक करोल पंकज देसाई नितिन कांबळे प्रकाश साटेलकर नंदू परब आदि उपस्थित होते यावेळी श्री उपरकर व समर्थक आक्रमक होत विविध मुद्द्यांवर प्रश्नांचा भडीमार केला यात प्रवासी वाहतूक परवाना घेऊन वाहतूक बस चालवणारे गोवा मुंबई तसेच मुंबई गोवा या बस मालकांकडून बस असलेल्या सामान ठेवणाऱ्या डिकीतून व टप वरून वाहतूक करत आहेत मालवाहतुकीमध्ये विना बिल जीएसटी चुकवून मालवाहतूक केली जाते त्यावर कोणतीही कारवाई केली नाही किंवा जीएसटी विभागाला कळवले नाही सदर प्रवासी वाहतूक करणारे बस मधून अमली पदार्थ गोवा बनावटीची दारू तसेच सोन्याचे मौल्यवान वस्तूंची तस्करी केली जाते त्याची पोलीस यंत्रणेने माहिती देऊन कोणतीही तपासणी केली जात नाही यावर्षी उपरकर यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे मुंबई वरून प्रवासी वाहतूक बस मधून येणाऱ्या बस मधून गोमासाची वाहतूक केली जाते याची पाहणी केली जात नाही तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस मधून दिवाळी गणपती व मे महिन्यात तसेच अन्य सुट्टी सणांच्या काळात महाराष्ट्र शासन परिवहन कायदे अंतर्गत प्रवासी वाहतूक एसटी भाड्याच्या दुप्पट आकारणी करावी असा निर्णय झालेला असताना प्रवासी वाहतूक करणारी किंवा बस मालक ॲपवरून दीडपट पेक्षा जास्त आकारणी करतात हा ॲप आपल्या कार्यालयाने दाखवलेला आहे तरीही याबाबत कोणतीही कारवाई केली जात नाही त्यामुळे कोकणातील प्रवाशांना मोठा भुर्दंड पडत आहे यावर वारंवार सूचना करून आपण कोणती कारवाई केल्यात असा प्रश्न श्री उपरकर यांनी केला तसेच काही वाहतूक बसचे पासिंग झालेले नाही किंवा इन्शुरन्स काढलेला नसतो किंवा प्रवासी वाहतूक परवाना काढून परमिट टॅक्स शासनाच्या तिजोरीत जमा होत नाही एक परमिट आठ दिवस पंधरा दिवस किंवा महिना वापरले जाते त्यामुळे वाहतूक करणारे प्रवासी किंवा परमिट लिस्टवर असणारे प्रवासी भिन्न असतात त्यामुळे बसचा अपघात झाल्यास त्या प्रवाशांना कोणताही इन्शुरन्स फायदा मिळत नाही सीझनमध्ये प्रवासी आंबे फणस घेऊन गेल्यास तिकीट व्यतिरिक्त आकारणी केली जाते गोवा कर्नाटक राज्याच्या सीमेवरती सीसीटीव्ही व आर्थिक मदत करण्याची महाआयुक्त परिवहन यांच्याकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याकरिता मागणी केलेली आहे त्यामुळे दोन राज्यांच्या सीमेवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची तात्काळ कारवाई करावी तसेच गोवा राज्यामध्ये ओव्हरलोड वाळू वाहतूक त्याचप्रमाणे आंबोली घाट फोंडा घाट बावडा घाट या घाटातून ओव्हरलोड वाहतूक 10 टायरी गाड्या वाहतूक करतात त्यावर परिवहन विभागाकडून ओव्हरलोड वाहतुकीबाबत कोणती कारवाई केली जात नाही आंबोली घाटात मल्टी एक्सेल गाड्यांना वाहतूक करण्याकरिता सा.बा सावंतवाडी यांनी बंदी घातलेली असतानाही वाहतूक केली जाते त्याचप्रमाणे कोल्हापूरला जोडणारा फोंडा घाट व वैभववाडीतून जाणारा बावडा घाट या घाटामधून मल्टी एक्सेलच्या गाड्या वाहतूक करत असतात त्या ओवरलोड गाड्यांवर कोणती कारवाई केली असा प्रश्न श्री उपरकर व उपस्थित त्यांनी केला त्याचबरोबर अनेक परप्रांतीय ड्राइवर अमली पदार्थ किंवा दारूच्या नशेत असतात त्याचप्रमाणे गोवा तसेच गोवा मुंबई जाताना बस वर एकच ड्रायव्हर नेमलेला असतो त्या बसवर दुसरा ड्रायव्हर आहे की नाही याची चौकशी करावी यामुळे अपघात होणे टाळू शकतो त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग 66 वर होणारे अपघात या अपघाताची कारणे रस्त्यावर माती साचून किंवा रस्त्याच्या ब्रिजवर पाणी साचून गाड्या चालवताना काचेवरती पाणी घेऊन ड्रायव्हरला पुढच्या न दिसल्यामुळे अपघात होत आहेत. बऱ्याच कर्नाटक पासिंग च्या गाड्या गोवा राज्यात विना विमा घेता किंवा त्या त्या राज्यात सस्पेंड केलेल्या गाड्या वाहतूक करण्याकरिता वापरल्या जातात राष्ट्रीय महामार्ग 66 हायवे रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी पाणी साठवून पाण्याचा निचरा होत नसल्याने त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेची माती दलदलीत होऊन रस्त्यावर येऊन अपघात होतात तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 हा 6×40 मध्ये असल्याने व ठेकेदाराला 60% बिल 15 वर्षात देण्याची अट शासनाने टेंडर मध्ये शेड्युल ए व बी मध्ये म्हटलेल्या असल्यामुळे ह्या ठेकेदाराने ह्या रस्त्याची देखभाल पंधरा वर्षे करून अपघात होणार नाही याची काळजी घेणे त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी अपघात होतील त्या ठिकाणी ॲम्बुलन्स क्रेन तातडीने पाठवायचे आहे व राष्ट्रीय महामार्गावरील आरटीओच्या नियमाप्रमाणे असलेल्या साईन बोर्ड स्पष्ट दिसतील असे लावायचे आहे स्पीड लिमिट बोर्ड ठीक ठिकाणी लावण्याचे गरजे गरज आहे अद्याप केलेले नाही कणकवली शहरातून जाणारा बीच गोव्याच्या दिशेने उतरतो व हळवल येथे जाणाऱ्या फाटा च्या वळणावर अपघात होऊन गाडी पलटी होऊन अपघात घडलेले आहेत अशा वेळी ब्रिज उतारावर स्पीड ब्रेकर किंवा गाडी हळू चालवा वळण आहे असे बोलणे गरजेचे आहे तसेच राष्ट्रीय महामार्ग 66 ला येताना परप्रांतीय ड्रायव्हर व रस्त्याची माहिती नसलेले ड्रायव्हर गाडी स्पीड मध्ये चालवतात किंवा कोणताही यंत्र दोषामुळे अपघात होऊन जखमी झाल्यास मदत कोठे मागायची हे कळत नसल्याने 5 ते 5किलोमीटर अंतरावर हेल्पलाइन बोर्ड लावून त्या बोर्डवर ॲम्बुलन्स व क्रेन पुरवण्याकरिता 24 तास मोबाईल नंबर तसेच आपत्कालीन विभागाचा दूरध्वनी क्रमांक लिहिणे असे सर्व शासकीय विभागांचे नंबर लावून राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फे हेल्पलाईनचे नंबर लावणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने एजंट मुक्त परिवहन कार्यालय असल्याची घोषणा केली आहे बऱ्याच परिवहन विभागाच्या सुविधा ऑनलाईन पद्धतीने पारदर्शक व सोयीस्कर केलेल्या असताना बहुतांशी वेळी आपल्या कार्यालयाचा सर्वर बंद असतो किंवा केलेला अर्ज स्वीकारला जात नाही त्यामुळे ऑफलाइन पद्धतीने काम करावे लागते हे ऑफलाइन पद्धतीचे काम अन अधिकृत असलेल्या एजंट कडून केले जाते त्या एजंटांच्या फॉर्म वरती विशिष्ट पद्धतीचा कोड लावून जेवढी झालेली कामे त्यांच्या कामनिहाय एजंट निहाय परिवहन विभागाचे हिस्सा व पैसे गोळा करण्याचे काम आपल्या कार्यालयाकडून केले जात असल्याचे आरोप श्री उपरकर यांनी थेट उपप्रादेशिक अधिकारी श्री काळे यांच्यावर केला.
तरी वरील सर्व मुद्दे आपल्या कार्यालयामध्ये शिष्टमंडळ सहित चर्चा करूनही आपल्या कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी हप्ते घेऊन सर्व बाबींवर दुर्लक्ष करत आहेत यामुळे मोठे अपघात घडतात व अनेकांना जीव गमावा लागतो यावर आपल्या कार्यालयाकडून कडक कारवाई न केल्यास 5 ऑगस्ट 2024 रोजी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा माजी आमदार श्री जीजी उपरकर व समर्थकांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग श्री विजय काळे यांना दिला.

______________________________
*संवाद मिडिया* जाहिरात

*👉पाहिजेत…पाहिजेत…पाहिजेत….!*🏃‍♀️🏃

👚👖👕👖👔👖🎽👖👚👖👕👖👚

*Cottonking व TYZER शोरूममध्ये कामासाठी होतकरू मुलं पाहिजेत !🏃‍♀️🏃*

*नोकरीची सुवर्णसंधी, स्थानिकांना प्राधान्य!*👨‍⚖

*💸आकर्षक पगार*

*📍पत्ता : कॉटनकिंग व टायझर शोरूम, रामेश्वर प्लाझा, मोती तलाव जवळ, सावंतवाडी*

*संपर्क : 📲9881234047*

*जाहिरात 
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा