You are currently viewing राज्यस्थरिय रोईंग स्पर्धा

राज्यस्थरिय रोईंग स्पर्धा

*राज्यस्थरिय रोईंग स्पर्धा*

*’एमआयटी एडीटी’ विद्यापीठाची बाजी*

*पुणेः*

येथील मिलिटरी इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या आर्मी‌रोईंग नोडवर नुकत्याच पार पडलेल्या ४९व्या महाराष्ट्र राज्य आऊटडोउर रोईंग अजिंक्यपद स्पर्धेत येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या डाॅ.विश्वनाथ कराड क्रीडा अकादमीने तीन सुवर्ण, एक रौप्य व एका कांस्य पदकासह बाजी मारली आहे. वरिष्ठ डब्ल्यू-२ गटात स्नेहा सोळंकी, भाग्यश्री घुले या जोडीने तर सब-ज्युनियर (१५ वर्षांखालील) गटात प्रतीक पवार व सांघीक एसजेबी-4 गटात वैभव लाड, श्रेयस गर्जे, प्रथमेश कांदे, कार्तिक कांबळे यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर ज्युनियर (१८ वर्षांखालील) गटात ओम लाड व शुभंकर फड या जोडीला सुवर्णपदक अगदी थोड्या फरकाने हुकल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तर एसजेबी-२ गटात वैभव लाड व कार्तिक कांबळे यांनी कांस्य पदक कमावले. या कामगिरीनंतर विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. डाॅ.सुनीता कराड, प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव, डाॅ.मोहित दुबे, डाॅ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, क्रीडा विभाग संचालक प्रा.पद्माकर फड यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

चौकट
*’इनडोअर’मध्ये एकतर्फी वर्चस्व*
इनडोअर रोईंगमध्ये विद्यापीठाच्या खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावताना एकूण सहा सुवर्णपदकांसह या प्रकारात आपले वर्चस्व गाजवले. विद्यापीठाने वरिष्ठ गटात एम१ई, एलडब्ल्यू१इ, मिश्र४ई, एलमिश्र४ई आणि सब-ज्युनिअर (१५ वर्षांखालील) बी१ई व बी२ई गटात सुवर्ण कामगिरी केली. यामध्ये आदित्य केदारी, भाग्यश्री घुले, स्नेहा सोळंखी, योगेश बोरोले, प्रतीक पवार, प्रथमेश कांदे, श्रेयश गर्जे या खेळाडूंचा समावेश होता.

______________________________

*संवाद मिडिया*

👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙼𝚊𝚔𝚎 𝚢𝚘𝚞𝚛 𝙿𝚊𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝚈𝚘𝚞𝚛 𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗…*
*𝙲𝚊𝚛𝚎𝚎𝚛 𝚒𝚗 𝙵𝚊𝚜𝚑𝚒𝚘𝚗 𝙳𝚎𝚜𝚒𝚐𝚗𝚒𝚗𝚐…*
👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*
(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
🔸कालावधी :- २ वर्षे
🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-कोणत्याही शाखेची १२ वी परीक्षा उत्तीर्ण.
🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.

*संपर्क:*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,
अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:
📱 74998 21369
कृपया पुढील Google form भरावा :
https://forms.gle/k5HygsNxeUTTMJmb7

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138545/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा