You are currently viewing वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग संलग्न व्यापारी महासंघ आयोजित वीज ग्राहकांचा जनता दरबार ४ जुलै रोजी कुडाळात

वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग संलग्न व्यापारी महासंघ आयोजित वीज ग्राहकांचा जनता दरबार ४ जुलै रोजी कुडाळात

*महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना अध्यक्ष श्री.प्रताप होगाडे राहणार उपस्थित*

 

कुडाळ :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या समस्या जिल्ह्यातील आर्थिक, सामाजिक तसेच शैक्षणिक घटकांवर विपरीत परिणाम करत असून या समस्या सर्व सिंधुदुर्ग वासीयांनी एकत्रित मिळून सोडविणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेने महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीज तज्ञ मा. श्री प्रताप होगाडे यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन केले आहे. कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे हा जनता दरबार सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत चालणार आहे. जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आपण सर्वांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले असल्याने वीज ग्राहकांच्या समस्या सोडविणे बाबतच्या या लढ्यात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन वीज ग्राहक संघटना जिल्हा सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

जवळपास गेले दीड वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना वीज ग्राहकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असून प्रत्येक तालुक्यात तालुका संघटना स्थापन करून महावितरण व्यवस्थेला जागृत करण्याचे काम करत आहे. जिल्हाभर वीज ग्राहकांच्या बैठका घेत, वेळप्रसंगी आंदोलन, उपोषण करून महावितरणला त्यांच्या कर्तव्याची जाण करून देत आहे. त्यामुळे महावितरण व्यवस्था देखील कामाला लागली झाली आहे, परंतु जिल्ह्यातील वीज वितरण अजूनही सुरळीत झालेले नाही, सडलेले जुनाट वीज खांब, जुन्या वीज वाहिन्या, ट्रान्सफॉर्मरची कमतरता त्यामुळे कमी दाबाने होणारा वीज पुरवठा, मागणी करूनही न मिळणारी शेती पंप जोडणी, विजेचा होणारा दिवस रात्रीचा खेळखंडोबा आणि त्यामुळे व्यापारी, लघुउद्योजक आदींचे होणारे नुकसान यामुळे जिल्ह्यातील जनता हवालदिल झाली आहे. तरीही आजही जील्हावासिय जागृत नसल्याने महावितरण विभाग निद्रिस्त आहे. महावितरण विभागाला जागे करून जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी उद्याच्या जनता दरबाराने सुरुवात करण्यासाठी जास्तीत जास्त वीज ग्राहक, व्यापारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आदींनी उपस्थित रहावे असे वीज ग्राहक संघटना जिल्हा यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा