You are currently viewing बुद्धिबळ स्पर्धेत श्री चेस अकॅडमी कणकवली च्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त 

बुद्धिबळ स्पर्धेत श्री चेस अकॅडमी कणकवली च्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त 

कणकवली :

 

नुकत्याच झालेल्या कर्नाटक व गोवा येथील जलद बुद्धिबळ मानांकन स्पर्धेत श्री चेस अकॅडमी कणकवली च्या खेळाडूंनी विविध गटात सहभाग घेतला होता. यात जवळपास ४५० खेळाडूंमध्ये त्यांनी आपले उत्कृष्ट प्रदर्शन करत स्पर्धेत पारितोषिक प्राप्त केली यामध्ये सात्विक मालंडकर (१५७८), अथर्व राणे, राधाकृष्ण गावकर यांनी मानांकन प्राप्त झाले आहे तसेच इतर खेळाडू सुश्रृत नानल , दिक्षा जाधव, मिनल सुलेभावी, तनिष्का आडेलकर, गार्गी सावंत, वरद तवटे, चेतन भोगटे, हर्षदा प्रभू यांनी विविध पारितोषिक प्राप्त केली आहेत, या सर्वांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. तसेच कर्नाटक (उडुपी) व गोवा आयोजकांनी सुद्धा सर्व मुलांचे कौतक केले वरील सर्व खेळाडूंना श्री चेस अकॅडमी कणकवली चे संचालक श्रीकृष्ण आडेलकर सर, राजेंद्र तवटे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आतापर्यंत या अकॅडमी मधुन गेल्या काही वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मुलांनी बुद्धिबळ प्रशिक्षण घेत अनेक स्तरावरील स्पर्धा सहभागी होत प्राविण्य मिळवले आहे, पुणे मुंबई येथे असणारे बुद्धिबळ खेळाचे महत्त्व जाणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात या अकॅडमी मार्फत विविध उपक्रम ऑनलाईन व ऑफलाईन राबविले जात आहेत त्याचा जिल्ह्यातील सर्व लहान मुलांनी लाभ घ्यावा असे आवाहन या श्री चेस अकॅडमी कणकवली च्या वतीने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा