You are currently viewing देवगडात ‘लाडकी बहीण’ योजनेच्या कागदपत्र मार्गदर्शनासाठी कक्ष

देवगडात ‘लाडकी बहीण’ योजनेच्या कागदपत्र मार्गदर्शनासाठी कक्ष

देवगडात ‘लाडकी बहीण’ योजनेच्या कागदपत्र मार्गदर्शनासाठी कक्ष

देवगड :

येथील देवगड आमदार संपर्क कार्यालयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मार्गदर्शनासाठी कक्ष उघडण्यात आल्याची माहिती देवगड जामसं डे नगरपंचायतीतील गटनेते शरद ठूकरुल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.या वेळीजिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळस्कर माजी नगराध्यक्ष प्रणाली माने, नगरसेविका तनवी चांदोसकर, माजी नगरसेविका प्राजक्ता घाडी, तन्वी शिंदे,भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दया पाटील,विभागीय अध्यक्ष योगेश पाटकर, वैभव कळंगुटकर, उपस्थित होते.

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून ही कागदपत्रे पूर्ण करून घेणे व मार्गदर्शन करणे यासाठी दोन स्वतंत्र व्यक्ती देवगड येथील आमदार संपर्क कार्यालयात नेमन्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सकाळी 10 ते दुपारी दीड या स त्रात ज्यांना या योजनेबद्दल माहिती हवी असेल किंवा कागदपत्रे पूर्ण करायची असतील या दोन्हींबाबत कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर तातडीने दिलेल्या वेळेमध्ये या कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन यावेळी शहर भाजपाने केले आहे. या योजनेचा फायदा नियमात बसणाऱ्या प्रत्येक महिलेने घ्यावा असे आवाहनही उपस्थित पदाधिकाऱ्यांनी या वेळी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा