पेंन्शन योजना लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले लवकरात लवकर भरावे…
कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांचे लाभार्थ्यांना आवाहन..
कणकवली
तालुक्यातील पेंन्शन योजना लाभार्थ्यांना जुलै महिन्याच्या १५ ते २० तारीख पर्यंत हयातीचे दाखले भरणे बंधनकारक आहे. ज्या लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले अद्याप पर्यंत भरले नसतील तर त्यांनी ते दाखले १५ ते २० जुलै पर्यंत कणकवली तहसीलदार कार्यालय येथे योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून जमा करणे गरजेचे आहे, असे आवाहन कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी पेंशन लाभार्थ्यांना केले आहे. कारण, यानंतर लाभार्थ्यांना मिळणारी पेंन्शन योजना ही ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने लाभार्थ्यांना हयातीचे दाखले भरलेले नसल्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता, असल्यामुळे वेळेतच हयातीचे दाखले भरून जमा करणे गरजेचे असल्याचे, तहसीलदार श्री. देशपांडे यांनी सांगितले.