You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये वैद्यदिन व पौगंडावस्थेत पाऊल टाकताना या कार्यशाळेचे आयोजन:

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये वैद्यदिन व पौगंडावस्थेत पाऊल टाकताना या कार्यशाळेचे आयोजन:

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये वैद्यदिन व पौगंडावस्थेत पाऊल टाकताना या कार्यशाळेचे आयोजन:

सावंतवाडी

लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्ती देखील शारिरिक व मानसिक दृष्ट्या काही अडचणी उद्भवल्यास वैद्यांच्या सल्ल्याने त्यांच्या योग्य मार्गदर्शनानेच त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. आणि वैद्य देखील आपल्या रुग्णांची तितकीच काळजी घेऊन त्यांना रोगमुक्त करतात. आणि अशा या वैद्यांचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना पटवून देण्याकरिता स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये राष्ट्रीय वैद्यदिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांंना पौष्टिक अन्न व जीवनसत्त्व यांचे आहारातील महत्त्व समजावून सांगण्यासाठी शाळेने ज्या २७ वर्षे आयोर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून, गेली दहा वर्षे संत गजानन महाराज कॉलेज महागाव गडहिंग्लज येथे असोशिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत असलेल्या एम. एस. आयुर्वेदा डॉ. गौरी गणपत्ये यांना आमंत्रित केले. डॉ. गौरी गणपत्ये यांनी विद्यार्थ्यांंना बाहेरील अन्नपदार्थ न खाता घरगुती पौष्टिक अन्न ग्रहण केल्यामुळे आपल्या शरीराला पोषक जीवनसत्वे प्राप्त होतात याबद्दल माहिती सांगितली. तसेच अन्नपदार्थ खाऊन झाल्यावर आपल्या दातांची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणकोणते पदार्थ खाल्ले पाहिजे व बाहेरील जंकफूड खाल्ल्यामुळे आपल्या शरीराचे कसे नुकसान होते ते पटवून दिले. विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शालेय सहा. शिक्षिका सौ. श्रावणी प्रभू यांनी केले. डॉ. गौरी गणपत्ये यांना छोटेसे रोपटे भेट म्हणून देण्यात आले. त्याचप्रमाणे, यादिवशी वैद्यदिनाचे औचित्य साधून इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांना पौगंडावस्थेतील होणारे शारीरिक बदल, मानसिक बदल, या वयात येणाऱ्या अनेक शारीरिक व मानसिक समस्या व त्या समस्यांचे निवारण या संबंधित माहिती देण्यात आली. सुरवंटापासून फुलपाखरापर्यंतचा प्रवास जसा नाजूक असतो, त्याप्रमाणे या नाजूक विद्यार्थी पौगंडावस्थेचे प्रवासवर्णन करण्याकरिता विद्यार्थ्यांचे सत्र घेण्यात आले. हे सत्र दोन टप्प्यात घेण्यात आले. इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थिनींनी सावंतवाडीच्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. भक्ती सावंत (एम. बी. बी. एस. गायनॅक) यांनी मार्गदर्शन केले. या सत्रात होणारे शारीरिक व मानसिक बदल व शरीरात होणाऱ्या बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या बदलल्या जाणाऱ्या भावना याविषयी माहिती देण्यात आली. या अवस्थेत परिस्थितीवर मात करून अभ्यासात लक्ष कसे केंद्रित केले पाहिजे याचे उत्तम मार्गदर्शन डॉ. भक्ती सावंत यांनी केले. तर, प्रशाळेच्या समुपदेशक व मानसोपचार तज्ञ डॉ. मोहिनी वज्राटकर यांनी वरील दोन इयत्तेच्या विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन केले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या या पौगंडावस्थेतील त्यांची होणारी चिडचिड, जिद्दपणा, आपले तेच खरे करण्याची वृत्ती या समस्या व त्याचे निराकरण याबद्दल त्यांनी आपल्या काळजाचा ठाव घेत माहिती दिली. त्यांनी देखील मार्गदर्शन करताना या वयाच्या अवस्थेत परिस्थितीवर मात करून आपले लक्ष अभ्यासात कशाप्रकारे केंद्रित केले पाहिजे या बद्दल माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी केले. वरील कार्यक्रमात उपस्थित डॉ. भक्ती सावंत व डॉ. मोहिनी वज्राटकर यांना छोटेसे रोपटे भेट म्हणून देण्यात आले. तसेच, कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे संस्थापक श्री. ऋजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांंना राष्ट्रीय वैद्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. वरील राष्ट्रीय वैद्यदिनाचे औचित्य साधून केलेल्या कार्यक्रमांचे संयोजन शालेय समन्वयक सौ. सुषमा पालव यांनी केले. तसेच कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा