बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देऊन ५ महिने झाले तरी अद्याप सीबीआयचा तपास पुर्ण होत नसल्याबद्दल टीका होत होती. त्यानंतर सीबीआयने भाजननेते सुब्रमण्यम स्वामी यांना माहिती देताना या प्रकरणात सुशांतच्या हत्येची शक्यताही नाकारता येत नाही, असे म्हटले होते. आता त्यावरुन वाद सुरु झाला असून मुंबई पोलिस आयु्क्त परमबीरसिंह यांनी सीबीआयही मुंबई पोलिसांप्रमाणेच निष्कर्ष काढेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत केला जात आहे. मला खात्री आहे की सीबीआयचे अधिकारी लवकरच या प्रकरणाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचतील. या प्रकरणाचा जो निष्कर्ष सीबीआयकडून काढला जाईल तो निष्कर्ष आमच्या तपासाशी मिळताजुळताच असेल. सर्वोच्च न्यायालयानेदेखील आम्ही केलेल्या तपासाला अतिशय प्रोफेशनल तपास असे म्हटले होते. त्यामुळे सीबीआय या प्रकरणाचा जो निष्कर्ष काढेल तो आमच्या निष्कर्षासारखाच असेल,असे मत परमबीरसिंह यांनी व्यक्त केले आहे.