*एक पेड माँ के नाम….*
*महाराष्ट्र भाजपाचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम सर्वत्र प्रभावीपणे राबवणार – भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशालभाई परब यांचे ग्रामपातळीवर नियोजन*
भारतीय जनता पार्टी केवळ मतांच्या राजकारणात रमणारा पक्ष नसून समाजकारण, पर्यावरण, आरोग्य आदी जनसामान्यांच्या प्रश्नात रस घेऊन काम करणारे समाजसेवी संघटन आहे. मागील आठवड्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपूर्ण राज्यात निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी “एक पेड मा के नाम” हा उपक्रम राज्यभर राबवण्याचे आवाहन भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले होते प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या आईला वंदन म्हणून एक तरी झाड लावावे अशी ही संकल्पना आहे. यातून वृक्षारोपण कार्यक्रमाला मातीच्या आणि मातेच्या नात्याची भावनिकता लाभावी हा या मागचा हेतू आहे.
या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष श्री विशालभाई परब यांनी युवा मोर्चातर्फे “बांदा ते चांदा” असा हा उपक्रम राबवला जाईल याची ग्वाही दिली आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून हा उपक्रम राबवण्याची घोषणा करत त्यांनी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमार्फत “वृक्षारोपण हेच आईला वंदन” असा अनोखा उपक्रम राबवण्याची तयारी पूर्ण केली आहे. सावंतवाडी पंचक्रोशी हायस्कूल, मळेवाड येथे जवाहरलाल नेहरू शाळा, आरोस येथे महाराष्ट्र राज्य कृषी सप्ताहानिमित्त करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना त्यांनी भाजपाच्या या उपक्रमाची माहिती दिली. कोकणचे नेते नारायणराव राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरू झालेले हे वृक्षारोपणाचे काम युवा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वी करून दाखवेल असा विश्वास विशालभाई परब यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत ॲड अनिल निरवडेकर, केतन आजगावकर, दिलीप भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
______________________________
*संवाद मीडिया*जाहिरात
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU मध्ये पदवी शिक्षण…. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…!👨🏻🎓*
*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२४-२५ वर्षांसाठी प्रवेश सुरु*
*YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*
◾ *बी.ए. / बी.कॉम*
◾ *एम. कॉम*
◾ *एम.ए.(मराठी)*
◾ *एम.ए.(हिंदी)*
◾ *एम.ए.(इंग्लिश)*
◾ *एम.ए.(अर्थशास्त्र)*
◾ *एम.ए.(लोक प्रशासन)*
◾ *एम.ए.(इतिहास)*
◾ *एम.बी.ए.(HR,Fin,Mkt)*
◾ *रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)*
◾ *गा़ंधी विचार दर्शन पदविका*
🔸 *तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*
https://sanwadmedia.com/140982/
*📌10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी*
💁🏻♀️ *स्पर्धा परीक्षा(उदा. MPSC, UPSC) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*
♦️ *RPD ज्युनि. कॉलेज स्थित YCMOU अभ्यासकेंद्रात प्रवेशसाठी आजच संपर्क करा*👇
*🔹मुख्य प्रवेश कार्यालय🔹*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज*
*आर.पी.डी.ज्युनि. कॉलेज गेट नं 2 समोर,*
*आनंदी कॉम्प्युटर शेजारी,*
*सावंतवाडी नगरपालिकेजवळ,* *सावंतवाडी*
*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
*8605992334 / 9422896699*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*