You are currently viewing शेतीमध्ये पारंपरिकता आणि तंत्रज्ञान यांची सांगड घाला…

शेतीमध्ये पारंपरिकता आणि तंत्रज्ञान यांची सांगड घाला…

शेतीमध्ये पारंपरिकता आणि तंत्रज्ञान यांची सांगड घाला…

जि प. सीईओ मकरंद देशमुख यांचे आवाहन:कुडाळ मध्ये मोठ्या उत्साहात जिल्हास्तरीय कृषी दिन साजरा..

कुडाळ

जो शेतकरी काही प्रयोग करायला तयार आहे. जे काही करायचे ते सावधानतेने करायची त्याची तयारी आहे तो आज यशस्वी होत चाललेला आहे. पारंपरिक शेती सोबतच आधुनिक तंत्रज्ञान वापरून, उपलब्ध माहितीचा आधार घेऊन कृषी क्षेत्र समृद्ध करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी मकरंद देशमुख यांनी केले. कुडाळ पंचायत समितीमध्ये झालेल्या जिल्हास्तरीय कृषी दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार विजेते शेतकरी, भात पीक आणि नाचणी पीक स्पर्धेतील विजेते शेतकरी, मनरेगा अंतर्गत जास्तीत जास्त क्षेत्रावर बांबू आणि फळबाग लागवड करणारे कर्मचारी, जास्तीत जास्त शेतकरी मासिक वर्गणी जमा करणारे कर्मचारी आणि बांबू लागवड प्रसार करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात येते. आज कुडाळ कुडाळ पंचायत समिती मध्ये मोठ्या उत्साहात हा जिल्हास्तरीय कार्यक्रम झाला. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आणि कुडाळ पंचायत समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल होत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख आणि ऊपस्थित मान्यवरांच्या उपस्थतीत वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा कृषी अधिकारी वीरेश अंधारे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग विजयकुमार राऊत, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद जानबा झगडे, स्मार्ट प्रकल्प मूल्य साखळीतज्ञ लक्ष्मण खुरकुटे, प्रकल्प उपसंचालक आत्मा सिंधुदुर्ग नामदेव परीट, तंत्र अधिकारी रवींद्र पाटील, गट विकास अधिकरी धनंजय जगताप, सहाय्यक गट विकास अधिकारी श्याम चव्हाण, गोविंद चौगुले, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस श्री. धामापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंगेश कदम खांबाळे वैभववाडी, देवेंद्र नारकर फणसगाव देवगड, सदानंद गवस धाकोरे सावंतवाडी, रवींद्र गावडे नापणे वैभववाडी, अर्जुन रेडकर आरोंदा सावंतवाडी बाबा पाटणकर पडेल देवगड प्रभाकर डाफळे नाधवडे वैभववाडी, राजाराम गुरव खांबाळे वैभववाडी, संतोष पडवळ,तसेच विद्याधर सुतार सेवा निवृत्त बीडीओ, श्रद्धा आढळकर ग्रामसेवक ग्रामपंचायत तुळसुली कार्याद नारुर, प्रियांका प्रकाश चव्हाण ग्राम रोजगार सेवक ग्रामपंचायत तुळसुली कार्याद नारुर, भूषण चव्हाण ग्रामविकास अधिकारी घावनळे, नम्रता माडेश्वर ग्राम रोजगार सेवक घावनाळे, वासुदेव कसालकर ग्राम विकास अधिकारी वाडोस, प्रसन्ना म्हाडगूत, ग्राम रोजगार सेवक वाडोस, महादेव खरात विस्तार अधिकारी पंचायत समिती कुडाळ, सानिका पालव ग्रामसेवक भडगाव बुद्रुक, सतीश साळगावकर ग्रामसेवक कवटी, संतोष खोत प्रगतशील शेतकरी बांबू लागवड, राणे गुरुजी कसाल प्रगतशील शेतकरी,कृषी विषयक पुस्तके स्टॉलधारक गोविंद चौगुले कोल्हापूर, स्थानिक देशी कृषी बियाणे स्टॉलधारक जयराम परब आणि सूर्यकांत कुंभार यांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग विजयकुमार राऊत आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकरी मकरंद देशमुख यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आज कशा प्रकारची शेती करणे आवश्यक आहे याची माहिती दिली.
यावेळी प्रगतशील शेतकरी मिलिंद पाटील यांनी बांबू लागवड विसाहत्यि मार्गदर्शन केलं. तर सचिन चोरगे यांनी भात स्थानिक वाण संवर्धन आणि विक्री व्यवस्थापन यावर आणि सहाय्यक प्राध्यापक मुळदे महाविद्यालय डॉ वाय सी मुठाळ यांनी देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे कृषी विस्तार अधिकारी जानबा झगडे यांनी केलं. सर्वाचं स्वागत गट विकास अधिकारी धनंजय जगताप यांनी तर सूत्रसंचालन कृषी अधिकारी बाळकृष्ण परब यांनी केलं. यावेळी कृषी विभागाचे बाळकृष्ण परब, महादेव खरात, संदेश परब, दत्ताराम आंबेरकर, अमित देसाई, तालुका कृषीचे अमोल करंदीकर, श्री. धारगळकर, श्री. कामतेकर उपस्थित होते तसेच जिल्हाभरातून शेतकरी बांधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा