You are currently viewing कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञांनी स्विकारला कार्यभार

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञांनी स्विकारला कार्यभार

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञांनी स्विकारला कार्यभार

कणकवली

गेल्या अडीच महिन्यापासून रिक्त असलेल्या कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ज्ञ पदी डॉ. नित्यानंद मसूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. मसूरकर यांनी कार्यभार स्वीकारला आहे. मसूरकर यांची ओरोस जिल्हा रुग्णालय येथे नेमणूक असून त्यांना ‘डेप्युटेशन’वर येथे पाठविण्यात आले आहे, अशी महिती उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील यांनी दिली.

यापूर्वी येथे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शिकलगार यांची बदली झाली. त्यानंतर रुग्णालयाला पूर्णवेळ स्त्रीरोग तज्ज्ञ मिळू शकला नव्हता. पुढे ऑनकॉल, एनएचएम, कंत्राटी पद्धतीने येथे स्त्रीरोग तज्ज्ञ कार्यरत होते. मात्र, सर्वात शेवटी कार्यरत असलेल्या महिला स्त्रीरोग तज्ज्ञांनी काही कारणास्तव ४ एप्रिलला राजीनामा दिला होता. परिणामी रुग्णालयातील प्रसूतीविभाग जवळपास बंदच झाला होता. तर महिला रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागत होते. आता डॉ. मसूरकर हे स्त्रीरोगतज्ज्ञ उपजिल्हा रुग्णालयात रुजू झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा