You are currently viewing श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांना “लोकहितवादी रावबहाद्दूर सी.के.बोले पुरस्कार 2024 च्या अनुषंगाने समाज रत्न (शैक्षणिक क्षेत्र) पुरस्कार प्रदान

श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांना “लोकहितवादी रावबहाद्दूर सी.के.बोले पुरस्कार 2024 च्या अनुषंगाने समाज रत्न (शैक्षणिक क्षेत्र) पुरस्कार प्रदान

*श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांना “लोकहितवादी रावबहाद्दूर सी.के.बोले पुरस्कार 2024 च्या अनुषंगाने समाज रत्न (शैक्षणिक क्षेत्र) पुरस्कार प्रदान*

भंडारी समाजाचे मानबिंदू, लोकहितवादी रावबहाद्दूर सी.के.बोले व राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तिंना पुरस्कृत करण्यात आले. तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, प्रख्यात व्याख्याते व मुंबई सीमाशुल्क विभागात अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत असणारे उच्चविद्याविभूषित कोकण भूमिपुत्र, मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांना “लोकहितवादी रावबहाद्दूर सी.के.बोले पुरस्कार 2024 च्या अनुषंगाने समाज रत्न (शैक्षणिक क्षेत्र) पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

दिनांक 29 जून 2024 रोजी दादर येथील भंडारी मंडळ हॉल येथील कार्यक्रमात श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्या वतीने “तिमिरातुनी तेजाकडे” या संस्थेचे अध्यक्ष, श्री. सचिन यशवंत रेडकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मा. सत्यवान यशवंत रेडकर हे उच्चविद्याविभूषित असून त्यांनी हल्लीच एम.ए (लोक प्रशासन) ही नववी शैक्षणिक अर्हता सुद्धा प्राप्त केली आहे. ते आपल्या वैयक्तिक तसेच शासकीय सुट्ट्यांचा उपयोग विविध जिल्ह्यात, गावात, महाविद्यालयात, शाळांमध्ये किंवा वैयक्तिक नियोजनाच्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे मानधन न स्वीकारता संपूर्णतः निःशुल्क स्वरूपात शासकीय स्पर्धा परीक्षा या विषयावर जनजागृती व मार्गदर्शन करण्याचे कार्य करतात. त्यांची तिमिरातुनी तेजाकडे नामक शैक्षणिक चळवळ प्रसिद्ध आहे. त्यांनी 268 निशुल्क मार्गदर्शन व्याख्याने पूर्ण केले असून मार्गदर्शनाच्या माध्यमातून जवळपास 20 शासकीय यशोगाथा निर्माण झाल्या आहेत. कोकणाच्या मातीशी असलेली नाळ कायम ठेवत ज्ञानदानाच्या माध्यमातून शासकीय कर्मचारी यांचे गाव तसेच भ्रष्टाचार मुक्त प्रशासन घडविण्यासाठी मा. सत्यवान यशवंत रेडकर अविरतपणे आपले योगदान देत आहेत. त्यांना प्राप्त झालेल्या पुरस्काराबद्दल तसेच संपादित केलेल्या नवव्या शैक्षणिक अर्हते बद्दल सर्वच स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

______________________________
*संवाद मिडिया*जाहिरात

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*TV
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/139227/

*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*

========================
*MHT -CET बॅच*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा