You are currently viewing जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी समीर वंजारी यांच्या अध्यक्षपदाला प्रदेश काँग्रेसकडून स्थगिती…

जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी समीर वंजारी यांच्या अध्यक्षपदाला प्रदेश काँग्रेसकडून स्थगिती…

जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी समीर वंजारी यांच्या अध्यक्षपदाला प्रदेश काँग्रेसकडून स्थगिती…

सावंतवाडी

जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्षपदी समीर वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु या नियुक्तीला आता प्रदेश काँग्रेसने स्थगिती दिली आहे .प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार राज्य सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी संबंधितांना पत्र दिले आहे .प्रदेश काँग्रेसने जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांची तडकाफडकी उचलबांगडी करून समीर वंजारी यांची प्रभारी जिल्हाध्यक्षपदी निवड केली होती मात्र यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ माजली. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. या पार्श्वभूमीवर समीर वंजारी यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे आता इर्शाद शेख पुन्हा जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा