You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हयातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पूर्ण क्षमतेने सुरू असल्याचे सिद्ध

सिंधुदुर्ग जिल्हयातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पूर्ण क्षमतेने सुरू असल्याचे सिद्ध

*सिंधुदुर्ग जिल्हयातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पूर्ण क्षमतेने सुरू असल्याचे सिद्ध

*सावंतवाडी दवाखान्यात १० हजार ४५४ तर कणकवलीत २१३८,रुग्णावर केले उपचार

*उबाठा आमदार वैभव नाईक यांनी विधान सभेत दिलेली माहिती ठरली खोटी

* याठीच विधानसभेच्या पटलावर चुकीची माहिती येवू नये म्हणून आम. राणे यांनी रोखले होते आम.नाईक यांना

कणकवली
उबाठा आमदार वैभव नाईक यांनी अर्धवट आणि चुकीच्या माहितीच्या आधारावर विधान सभेच्या सभागृहात प्रश्न मांडले असल्याचे उघड झाले आहे.सिंधुदुर्ग जिल्हयात हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कणकवली आणि सावंतवाडी येथे सुरू असताना हे दोन्ही दवाखाने बंद आहेत अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी सभागृहात दिली होती.प्रत्यक्ष पाहणीत या दोन्ही दवाखान्यांमध्ये तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी,नर्स आणि इतर कर्मचारी उपस्थित राहून दरदिवशी सेवा देतात. या दवाखान्यात प्रत्येक महिन्याला दोनशे ते तीनशे रुग्णाची आरोग्य तपासणी आणि उपचार दिले जातात. दवाखाना चालू झाल्यापासून गेल्या वर्षभरात कणकवलीत २१३८ रुग्णांनी उपचार घेतले आहेत.तर सावंतवाडीत १० हजार ४५४ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
सिंधुदूर्ग जिल्हयात हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कणकवली आणि सावंतवाडी या दोन्ही ठिकाणी सुरू आहेत.या दवाखान्यात महिन्याला दोनशे ते हजार इतके रुग्ण उपचार घेत आहे.यावेतिरिक्त रक्त, युरिन नमुने सुद्धा तपासणी साठी घेतले जातात.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना’ ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना आहे. तशीच ती राज्यात उत्तमरित्या यशस्वी देखील झाली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात “आपला दवाखाना’ चे रुग्णालय सुरू करण्यात आले. कणकवली तालुक्यात देखील पंचायत समिती नजिक “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला. त्यामुळे रुग्णाची होणारी गैरसोय दूर झाली. एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी,नर्स, व इतर कर्मचारी सेवा देतात.या ठिकाणी रुग्णाचे रक्त, युरीन चे नमुने घेवून ते तपासले जातात. त्यामुळे जिल्हा किंवा उप जिल्हा रुग्णालयात रुग्णांना जाण्याची गरज नाही. तर या दवाखान्यांमध्ये जिल्हा ,उप जिल्हा रुग्णालयावर येणारा ताण कमी झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा