*संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल नाला अतिक्रमण प्रश्नी कुडाळ नगरपंचायतचे मुख्याधिकारी बिल्डरला पाठीशी घालण्याचे नेमके कारण काय.* ??
*मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल.*
संत राऊळ महाराज सर्कल नाला अतिक्रमण प्रश्नी मोठ्या प्रमाणात पाणी साचून सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासावर मनसेने सर्व प्रथम आवाज उठवल्यानंतर कुडाळ नगरपंचायतच्या सर्वच्या सर्व १७ नगरसेवकांनी सदर अतिक्रमण प्रश्नी लेखी आक्षेप घेतला. असे असताना सुद्धा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नाल्या बाबत आपल्या हित संबंधासाठी चुकीच्या पद्धतीने बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांस पाठीशी घालत आहेत. सर्वांच्या तक्रारी नंतर नगरपंचायत प्रशासनाची भुमिका नेमकी काय याच्यावर कुडाळ वासियांचे लक्ष असताना मात्र मुख्याधिकारी आणि नगरपंचायत इंजिनिअर शांत बसून आहेत. मुख्याधिकारी यांनी एकतर बिल्डर ने केलेले अतिक्रमण बरोबर आहे असं सांगावे अथवा पाणी साचून होणारा त्रासा बाबतच्या आमच्या तक्रारी/आक्षेप चुकिचे आहेत असं तरी सांगाव.काय तरी एक भुमिका घ्यावी याबाबत सतत पाठपुरावा करुन देखील याबाबत प्रशासन कोणत्याही प्रकारची बाजु सांगत नाही. आचारसंहिता तसेच इतर कारणे देत आज उद्या करुन दिवस ढकलण्याचे काम सुरू आहे. प्रशासनानेच आपली भुमिका लेखी स्वरुपात न दिल्यास नगरपंचायत मधेच ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल .अशाच प्रकारे कुडाळ नगरपंचायत मार्फत बिल्डरांना शहरात अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने नियमबाह्य परवानग्या दिल्यामुळे तेथील रहिवासांना फार मोठ्या त्रास सहन करावा लागत आहे. त्याची तक्रार सोसायटी रहिवाशांनी करून सुद्धा हे नगरपंचायत चे अधिकारी त्याच बिल्डरांना कोणतीही कारवाई न करता पुन्हा दुसऱ्या ठिकाणी नव्याने परवानगी देत आहेत. याबाबत सुद्धा सविस्तर माहिती घेऊन मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिला आहे.
______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*
*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!
*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩⚕👩⚕
*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/
*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*
_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._
_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._
_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*
*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*
https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*