You are currently viewing बांदा केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका यांचा सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ संपन्न

बांदा केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका यांचा सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ संपन्न

*बांदा केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका यांचा सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ संपन्न*

*बांदा*

बांदा केंद्रशाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासात मुख्याध्यापिका उर्मिला सावंत-मोर्ये यांचा सिहाचा वाटा आहे. ज्ञानदानाचे कार्य करून त्यांनी केवळ विद्यार्थीच घडविलेत नाहीत तर याही पलीकडे त्यांनी सर्वाना एकत्रित घेत शाळेचे उत्तम व्यवस्थापन राखले. शाळेबद्दल असलेली त्यांची तळमळ व झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीनेच आज केंद्रशाळा ही राज्यस्तरावरील एक उत्कृष्ट शाळा म्हणून नावारूपास आली आहे. त्यांनी निवृत्तीनंतरही आपले शैक्षणिक कार्य निरंतर सुरु ठेवावे असे कौतुकोदगार विविध मान्यवरांनी येथे काढले.
बांदा पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला सावंत-मोर्ये या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यात. यानिमित्त प्रशालेत सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रप्रमुख संदीप गवस, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, हेमंत मोर्ये, त्यांचे पती महादेव सावंत-मोर्ये, वडील लक्ष्मण सुर्वे, बहीण शुभांगी गावडे, अर्जुन मार्गी, सरस्वती मार्गी, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी अनुराधा मोर्ये, केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, संतोष बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महिला शिक्षकांनी सौ. सावंत-मोर्ये यांचे औक्षण केले. यावेळी केंद्रशाळा, व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्यावतीने अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, गणेश मूर्ती देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी दैनिक ‘सकाळ’ने उर्मिला सावंत-मोर्ये यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेताना प्रसिद्ध केलेल्या पुरवणीचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी प्रशाळेतील शिक्षक सौ. शीतल गवस, सौ. शुभेच्छा सावंत, सौ. जागृती धुरी, सौ. रसिका मालवणकर, संदीप गवस, हेमंत मोर्ये, नरेंद्र सावंत, रत्नाकर आगलावे यांनी मनोगतात अनेक आठवणीना उजाळा दिला. विद्यार्थ्यांमधून स्वामिनी तर्पे, सर्वेक्षा ढेकळे यांनी मनोगत व्यक्त करत सावंत-मोर्ये यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
महादेव सावंत-मोर्ये म्हणाले की, आपल्या ३५ वर्षांच्या सेवेच्या कालावधीत सौ. सावंत-मोर्ये यांनी शाळेलाच दुसरे घर मानून कार्य केले. त्यांनी या कालावधीत घरी देखील दुर्लक्ष केले. कोणतेही काम जिद्दीने पूर्ण करणे ही त्यांची हातोटी होती. त्यामुळेच शाळा सुटल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत शाळेत थांबून त्या काम करत.
सत्काराला उत्तर देताना सौ. सावंत-मोर्ये या भावुक झाल्यात. आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. माझे सर्व सहकारी शिक्षक, व्यवस्थापन समिती, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांनी केलेल्या सहकार्यामुळेच आपण याठिकाणी शाळेच्या विकासासाठी भरीव योगदान देऊ शकले. विद्यार्थी ही माझी खरी ताकद होती. या शाळेच्या विक्रमी पटसंख्येमुळे आपल्याला याठिकाणी विद्यार्थ्यांच्या सानिध्यात राहून काम करण्याची सतत ऊर्जा मिळाली. यापुढेही शाळेसाठी व शैक्षणिक मार्गदर्शनासाठी आपण नेहमीच तत्पर राहू.
यावेळी शिक्षक यावेळी शिक्षक शांताराम असनकर, जे. डी. पाटील‌, फ्रान्सिस फर्नांडिस, रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, जागृती धुरी, कृपा कांबळे, विनिता गोसावी, मनिषा काळे, मृणाल परब, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, गुरु कल्याणकर, हेमंत दाभोलकर, यश माधव, दीपक बांदेकर, राजू देसाई आदि शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक जे. डी. पाटील यांनी केले. आभार शांताराम असनकर यांनी मानले.
चौकट :-
तत्पूर्वी बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळेच्या पालकांनी आंदोलन करून ताब्यात मिळालेल्या लगतच्या शाळेच्या इमारतीचे फीत कापून उदघाटन उर्मिला मोर्ये यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दीपप्रज्वलन करून व सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या इमारतीत ज्ञानदानाचे कार्य आजपासून सुरु करण्यात आले.

______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा