You are currently viewing राज्यात महायुतीचे सरकार राज्यातील माता-भगिनींच्या पाठीशी खंबीर

राज्यात महायुतीचे सरकार राज्यातील माता-भगिनींच्या पाठीशी खंबीर

*राज्यात महायुतीचे सरकार राज्यातील माता-भगिनींच्या पाठीशी खंबीर*

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे स्वागत*

*भाजपा महिला सडुरे बूथ अध्यक्षा तथा सडूरे शिराळे ग्रामपंचायत सदस्या सौ विशाखा नवलराज काळे यांचे प्रतिपादन.*

*वैभववाडी-*

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, यांच्या नेतृत्वाखाली व महायुतीचे सर्वच मंत्री आमदार पदाधिकारी यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्वपूर्ण योजना आहे. आर्थिक, दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खाते प्रति महिना 1500 रुपये जमा होणार असून 21 ते 60 वयोगटातील विवाहित,विधवा, घटस्फोटीत, परीत्यक्ता आणि निराधार महिलांना या योजनेचा मिळणार आहे लाभ. कुटुंबाच्या एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये दीड लाख पेक्षा कमी असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तरी सर्व माता भगिनींनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा महिला सडुरे बूथ अध्यक्ष तथा सडूरे शिराळे ग्रामपंचायत सदस्या सौ विशाखा नवलराज काळे यांनी केले आहे. त्याने प्रत्येक पत्रकाद्वारे राज्य सरकार राज्यातील माता-भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्य सरकारने घेतलेला निर्णय महिलांना सक्षमीकरण करण्याकरिता योग्य ठरेल या तिळ मात्र शंका नाही. राज्यातील माता-भगिनींसाठी राज्य सरकारने नवनवीन उपक्रम राबवून माता-भगिनींचा सन्मानच केला आहे त्यामुळे हे सरकार गोरगरिबांचं वंचितांचे शोषितांचा आहे सर्वांना न्याय देत काम करीत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आणि याच सरकारच्या सत्तेतील पक्षाचा आम्ही पदाधिकारी असल्याचा देखील आम्हास सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन सौ काळे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा