धक्का मित्रमंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…
मालवण
सेवा कार्यात वाहून घेतलेल्या येथील धक्का मित्रमंडळाच्या वतीने मालवण मधील फातिमा कॉन्व्हेंन्ट आणि कन्याशाळा येथील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
‘एक हात मदतीचा’ असे ब्रीदवाक्य घेऊन मालवण मधील सामाजिक क्षेत्रात धक्का मित्रमंडळ नेहमीच समाजपयोगी उपक्रम राबवित आहे. मालवण मधील रक्तदान चळवळीतही या मंडळाचे मोठे योगदान असून सातत्याने रक्तदान शिबीरे आयोजित केली जात आहेत. तसेच कोरोना महामारी काळातही या मंडळाने नागरिकांना विविध सेवा दिल्या. मंडळाचे सामाजिक कार्य सुरूच असून मालवण मधील फातिमा कॉन्व्हेंन्ट मधील मुलींना वह्या, पेन, छत्री आणि इतर शालोपयोगी साहित्य वितरित करण्यात आले. तसेच कन्याशाळा प्रशालेतील गरजू १५ मुला मुलींना शालेय गणवेश तसेच आठवी ते दहावी पर्यंतच्या ७५ विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. या मदतीबद्दल दोन्ही संस्थांमधील पदाधिकारी, शिक्षक यांनी धक्का मित्रमंडळाचे आभार मानले.
यावेळी धक्का मित्रमंडळाचे सदस्य हेमंत शिरगांवकर, देवा तोडणकर, संजय गावडे, बाबू डायस, भूषण पिसे, नितेश जाधव, प्रणव गावकर, राहुल केळूसकर, नितीन कोटीयान, अनिकेत मयेकर, अनिकेत चव्हाण, रोहित चव्हाण, शंकर पाटकर, भालचंद्र आपकर, गौरेश कांबळी, मयु पारकर, केशव साठे, प्रशांत हिरनवाळे आदी उपस्थित होते.