You are currently viewing बांदा शहरात विजेचा वारंवार लपंडाव सुरु असल्याने भाजप आक्रमक…

बांदा शहरात विजेचा वारंवार लपंडाव सुरु असल्याने भाजप आक्रमक…

बांदा शहरात विजेचा वारंवार लपंडाव सुरु असल्याने भाजप आक्रमक…

जावेद खतीब व बाळु सावंत यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण च्या कार्यालयाला घेराव; दोन दिवसात समस्या मार्गी लावू; अधिकाऱ्यांच आश्वासन..

बांदा

बांदा शहरातील विजेच्या समस्याबाबत आज भाजपचे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब व उपसरपंच बाळु सावंत यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक अभियंता एस आर कोहळे यांना घेरावो घालत जाब विचारण्यात आला. यावेळी येत्या दोन दिवसात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन समस्या मार्गी लावण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

बांदा शहरात विजेचा वारंवार लपंडाव सुरु असून वीज गुल होण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे शहरातील ग्राहक त्रस्त झाले आहेत. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने श्री खतीब व श्री सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अभियंता श्री कोहळे यांना घेरावो घालत जाब विचारला. शहरात लाईट जाण्याचे प्रकार हे वाढले असून शहरात विजेच्या अनेक समस्या आहेत. शहरातील बऱ्याच भागात कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने याचा परिणाम विजेच्या उपकरणांवर होत असल्याबाबत श्री खतीब यांनी निदर्शनास आणून दिले.
शहरात प्रस्तावित असलेल्या ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर कार्यान्वित करावेत. जीर्ण वीज खांब, जीर्ण वीज वाहक तारा तातडीने बदलाव्यात अशी मागणी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात दोन दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन श्री कोहळे यांनी दिले.
यावेळी गुरुनाथ सावंत, साईनाथ धारगळकर, हेमंत दाभोलकर, विकी कदम, शुभम साळगावकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा