You are currently viewing काव्यपुष्प-८४ वे

काव्यपुष्प-८४ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरुण वी देशपांडे लिखित श्री गोंदवलेकर महाराज काव्यचरितावली*

 

काव्यपुष्प-८४ वे

—————————————–

श्री महाराजांचे कार्य अलौकिक । प्रिय त्यांना रामनाम एक ।

उपदेश अनमोल त्यांचे अनेक । भक्तांच्या कल्याणाचे ।।१ ।।

 

लोकसंग्रह त्यांचा मोठा होता । भक्त गोतावळा थोर होता ।गावोगावीचा त्यांचा चाहता । येई दर्शनास ।। २ ।।

 

तत्व महाराजांचे । लोकांना प्रेमाने सांभाळण्याचे । त्यांच्याशी प्रेमाने बोलण्याचे । सर्वकाळ असे ।। ३ ।।

 

महाराजांच्या दरबारी भरे । वादविवाद, तंटे सारे । मिटविती मोठ्या खुबीने सारे । श्रीमहाराज ।। ४ ।।

 

लोककल्याणाची ईच्छा रामरायाची । आपणच पूर्ण करायची । धडपड हीच सदाची । मनात महाराजांच्या ।। ५ ।।

 

अपेक्षा कशाची नाही । ईच्छा कशाचीही नाही । मागणे कुणाजवळ नाही । असे वागले सदा श्री महाराज ।। ६ ।।

 

सदाचारी असावे । सर्वांशी प्रेमाने वागावे । रामनाम सदा घ्यावे । हेच सांगणे महाराजांचे ।। ७ ।।

********

करी क्रमशः लेखन कवी अरुणदास

—————————————–

श्री गोंदवलेकर महाराज काव्यचरितावली काव्यपुष्प-८४ वे

-अरुण वि.देशपांडे-पुणे

——————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा