You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा हा शांतताप्रिय, सुजाण नागरिकांचा जिल्हा : राजेंद्र दाभाडे

सिंधुदुर्ग जिल्हा हा शांतताप्रिय, सुजाण नागरिकांचा जिल्हा : राजेंद्र दाभाडे

घुंगुरकाठी’ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी. दाभाडे यांची घेतली भेट

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हा हा शांतताप्रिय, सुजाण नागरिकांचा जिल्हा असुन येथील नागरिक कायद्याचा आदर करणारे आहेत. अशा निसर्गसुंदर जिल्ह्यात काम करण्याची संधी मला मिळाली आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आज केले. ‘घुंगुरकाठी’ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी आज श्री. दाभाडे यांची भेट घेऊन त्यांना जिल्हावासियांतर्फे ग्रंथभेट देऊन नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी श्री. दाभाडे बोलत होते. श्री. लळीत यांनी त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याची संस्कृती, लोककला, पर्यटनस्थळे, कातळशिल्पे, साहित्यिक-सांस्कृतिक वारसा याची माहिती दिली. तसेच, ‘घुंगुरकाठी-सिंधुदुर्ग’ या सेवाभावी संस्थेने गेल्या वर्षभरात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी श्री. दाभाडे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा अत्यंत रमणीय व निसर्गसुंदर आहेच. अल्पावधीतच मला येथील पर्यटनाच्या अमर्याद क्षमतांची कल्पना आली आहे. निसर्ग, इतिहास यांनी हा जिल्हा अत्यंत समृद्ध आहे. याचबरोबर जिल्ह्यातील जनता ही कायदा पाळणारी, प्रशासन यंत्रणेचा आदर करणारी आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती, सामाजिक सलोखा अत्यंत चांगला आहे. याचे श्रेय येथील नागरिकांना आहे, अशा शब्दांत त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. सप्टेंबर २०२०मघ्ये जिल्हा पोलिस अधीक्षकपदी आलेले श्री. दाभाडे भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकारी असुन जिल्ह्यात येण्यापुर्वी ते मुंबईमध्ये गुन्हे विभागाचे उपायुक्त म्हणुन कार्यरत होते. अतिशय कार्यक्षम व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ते ओळखले जातात.

प्रतिक्रिया व्यक्त करा