भेट
दौडतात इलेक्ट्रॉन वीज भारित झाले अंग
भेटणार कधी कुठे सखे एकदा तरी सांग।
पाहताच बालीके तुजला डीपी लागला जळू
भेटताच सप्लाय माझा चालू होईल हळू हळू।
नको कुंपण जरी सबस्टेशन हे आऊटडोअर
खुल्लमखुल्ला भेट बघ बदली झाले कॅलेंडर।
जुळता उभयता तारा जॉईंट होईल पक्का
सोडशील सजने जेंव्हा न बोलण्याचा हेका।
नको बदलू जरी जुना झालाय ट्रान्सफॉर्मर
झालाय आधीच हैराण लोड शेडिंगने पामर।
बांधील तुजस्तव उच्च दाब वाहीनीचा मनोरा
झालाय किती हळवा भेटीलागे हृदय कोपरा।
होताच स्पर्श तुझा पेटतील तनामनातील दिवे
वाटे अणू रेणू होऊन तुझ्यात मिसळून जावे।
झालीय डाऊन बॅटरी करंटही झालाय कमी
होईल रिचार्ज जीवन दे सदा भेटीची हमी।
बिजलीहून चपल तू मज नको करू निराश
दे धक्का ४४० होल्टचा करून टाक बेहोश।
सिटी पिटी सारखी घिसीपिटी झाली स्वारी
भेटशील तेंव्हा सांगेल तूच खरीखुरी माधुरी।
संपले जुने वर्ष नवीन वर्षाचा संकल्प करतो
आपल्या भेटीसाठी भव्य पॉवर स्टेशन बांधतो।
विलास कुलकर्णी
मीरा रोड
7506848664
सर्व विद्युत अभियंत्यांकडून नवीन वर्ष २०२१ साठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा