You are currently viewing नेमळे येथे घरावर झाड कोसळून नुकसान…

नेमळे येथे घरावर झाड कोसळून नुकसान…

नेमळे येथे घरावर झाड कोसळून नुकसान…

सावंतवाडी

तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील नेमळे- गावकर कुंभारवाडी येथील पुंडलिक राऊळ व चंद्रकांत राऊळ यांच्या घरावर चिंचेचे झाड कोसळले. यात त्यांच्या एका खोलीचे नुकसान झाले आहे. ही घटना आज पहाटे घडली. सुदैवाने घरात असलेले सदस्य बचावले. दरम्यान याबाबतची माहिती समजतात नेमळे तलाठी श्री. पाटोळे, उपसरपंच सखाराम राऊळ, पोलीस पाटील रमेश नेमळेकर, सुनील राऊळ आदींनी पंचनामा करून पडलेले झाड हटविले. तसेच घराची नुकसान भरपाई तात्काळ मिळावी, अशी मागणी श्री. राऊळ यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा