*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वी देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली*
*काव्यपुष्प-८२ वे*
—————————————–
श्रीमहाराजांचे बोल । अर्थ यातला खोल । सारे उपदेश अनमोल । समजून घ्यावे भक्तजन हो ।। १ ।।
प्रपंच नि परमार्थ । स्वार्थ नि नि:स्वार्थ । अर्थाजन हाच जीवन अर्थ । ना समजे, तर सारे व्यर्थ । म्हणती श्रीमहाराज ।।२ ।।
निःस्वार्थी व्हावे । हे साधण्या प्रयत्नशील असावे । स्वार्थ त्यागण्या तयार असावे । हे शिकण्यास जावे संतांकडे ।। ३।।
संतांचे सांगणे । हेतू भक्त कल्याण करणे । वरवरचे ते वागणे । असते चुकीचे, संत सांगती ।।४ ।।
प्रपंच सोडणे सोपे नाही । तो सोडा, कुणी सांगत नाही । ज्याला सांगाल तो ऐकत ही नाही । सुटेना स्वार्थ सहजची ।।५ ।।
श्री महाराज म्हणे- वासना करा कमी । स्वार्था दूर ठेवण्या हे येते कामी । करा अनुसंधान भगवंताचे । नाम घेणे त्याचे, हीच युक्ती असे नामी ।।६ ।।
*******
क्रमशः करी लेखन कवी अरुणदास ।।
—————————————–
– अरुण वि.देशपांडे-पुणे
—————————————