You are currently viewing कोकण पदवीधर निवडणुकीसाठी उद्या मतदान ; १३ उमेदवार निवडणूक रिंगणात…

कोकण पदवीधर निवडणुकीसाठी उद्या मतदान ; १३ उमेदवार निवडणूक रिंगणात…

कोकण पदवीधर निवडणुकीसाठी उद्या मतदान ; १३ उमेदवार निवडणूक रिंगणात…

तालुक्यातून १६७९ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; चार केंद्रावर होणार मतदान..

देवगड

महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या २६ जून २०२४ रोजी मतदान होत आहे. देवगड तालुक्यात चार केंद्रावर मतदान होणार आहे .या निवडणुकीसाठी देवगड तालुक्यातून १६७९ पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार म्हणून निरंजन डावखरे तर काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रमेश कीर हे निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. देवगड तालुक्यात या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून तालुक्यात चार मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यामध्ये देवगड तहसील कार्यालयात दोन मतदान केंद्र तर शिरगाव हायस्कूल व पडेल हायस्कूल या ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
यातील देवगड तहसील कार्यालयातील मतदान केंद्र क्रमांक १०३ या केंद्रावर पुरुष मतदार ३२२, स्त्रि मतदार २१३ असे एकूण ५३५ मतदार,
मतदान केंद्र १०३ अ या केंद्रावर पुरुष मतदार ३३३ स्त्री मतदार २३० असे एकूण ५६३, मतदान केंद्र १०४ या केंद्रावर पुरुष मतदार १५३ स्त्री मतदार ६३ असे एकूण २१६, मतदान केंद्र १०५ वर पुरुष मतदार २३१ तर स्त्री मतदार १३४ असे एकूण ३६५ मतदार आहेत.देवगड तालुक्यातुन एकूण मतदारांपैकी पुरुष १०३९ तर स्त्रिया ६४० असे एकूण १६७९ मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा