You are currently viewing अधिकारी घडविणाऱ्या “महेंद्रा अकॅडमी” चा २५ जून रोजी कुडाळ येथे उद्घाटन सोहळा

अधिकारी घडविणाऱ्या “महेंद्रा अकॅडमी” चा २५ जून रोजी कुडाळ येथे उद्घाटन सोहळा

कुडाळ :

 

अधिकारी घडवण्याचे स्वप्न घेऊन कोकणात कामगिरी करणार्‍या “महेंद्रा अकॅडमीने” सावंतवाडीत बरोबरच आता आणखी एक दमदार पाऊल पुढे टाकले आहे. या अकॅडमीच्या माध्यमातून आता कुडाळ परिसरातील विद्यार्थ्यांना घडविण्याचा चंग बांधण्यात आला आहे. कुडाळ बसस्थानक परिसरात सुरू होणार्‍या या अकॅडमीचा उद्घाटन सोहळा मंगळवार तारीख २५ जून ला सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी तात्याचा ठोकळा पुस्तकाचे लेखक तसेच माजी विक्री कर अधिकारी एकनाथ पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले आणि युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले उपस्थित राहणार आहे.

गेली अनेक वर्षे सावंतवाडी येथे अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचे काम चालू आहे. अनेक विद्यार्थी घडले ही आहेत. पुढेही हे कार्य असेच चालू राहणार आहे. हाच पायंडा पुढे नेण्यासाठी कुडाळ येथे अकॅडमी सुरू करण्यात आली आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, सरळ सेवा भरती, राज्यसेवा संयुक्त परीक्षा यांसारख्या अनेक भरती प्रक्रिया करिता मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी घडविण्यासाठी अनुभवी शिक्षक, सुसज्य वाचनालय, या सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा