*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने*
*”संगीत सूर”*
नवे गीत नवे तराणे आळवूया सूर
जीवन करूया समृद्ध गाऊ नवा सूर!!धृ!!
घाम पिवूनी धान वाढवू खडकावर
पाषाणावर उगवती नवीन अंकुर
पहाट येईल अरुणिम छटा सृष्टीवर!!1!!
भंगलेल्या स्वप्नांची कथा कोण ऐकणार
अंतरीची व्यथा कशी कोण समजणार
काळाच्या कपाळी लिहू ना हार मानणार!!2!!
पशु-पक्षी कीटक सजीवाला असे हुंकार
बरसत्या मेघासह येती सप्तनाद स्वर
आघाता शिवाय ना येती मंजुळ सूर!!3!!
गाता गळा पिके मळा येई निरागस सूर
बारा सुरांवर मिळवू विजय होऊ स्वार
संगीतानं जीवनानंदास येई बहर!!4!!
सरस्वती विणेचे झंकार येती अलवार
कृष्णाच्या बासरीतून येती मधुर सूर
नृत्य येई नैसर्गिक मन मोदे विभोर!!5!!
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.