*कोकण पदवीधर निवडणुकीत डावखरेंचा विजय निश्चित, फक्त मताधिक्याचं औत्सुक्य- अॅड नकुल पार्सेकर*..
कोकण पदवीधर निवडणुकीसाठी २६ जून रोजी मतदान संपन्न होत आहे. या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार अॅड. निरंजन डावखरे ह्याचा विजय निश्चित असून फक्त मताधिक्य किती घेणार एवढीच उत्सुकता आहे. डावखरे हे जरी महायुतीचे उमेदवार म्हणून लढत असले तरी या मतदार संघात शिंदे सेना व अजितदादा राष्ट्रावादी यांचा तसा प्रभाव नाही. ठाण्याचे विद्यमान विधानसभा आमदार श्री संजय केळकर यांचा निरंजन डावखरे हे राष्ट्रवादीत असतात एकदा केलेला पराभव हा अपवाद वगळता सातत्याने गेली कित्येक वर्षे हा कोकण पदवीधर मतदार संघ भाजपा व संघ परिवाराचा बालेकिल्ला राहिलेला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांचा हा मतदारसंघ. इतर निवडणुकी पेक्षा ही प्रक्रिया फार क्लिष्ट असते. ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नोंदणी केली असेल व मतदारांना मतदानासाठी बाहेर काढले जात असेल त्या पक्षाला हा विजय मिळवणे सोपे. ठाणे जिल्ह्यात सगळ्यातं जास्त नोंदणी असून त्याच मतदानावर विजय निश्चित असतो. नाही म्हणायला यावेळी सिंधुदुर्गात मागच्या पेक्षा तिप्पट नोंदणी आहे.. अर्थात या पाचही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नोंदणी ही भाजपाने केलेली आहे. आघाडीने किर यानां उमेदवारी दिलेली असली तरी एकंदरीत त्यांचे निवडणुकीचे व्यवस्थापन पहाता एक सोपस्कार म्हणून ही निवडणूक आघाडी लढत आहे. भाजपाचे चोख निवडणुक व्यवस्थापन आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची सर्व प्रकारची आवश्यक व्यूहरचना यामुळे डावखरे ही निवडणूक सहजपणे जिंकतील. निवडणूक कोणतीही असो अगदी ग्रामपंचायतीची निवडणूक असली तरी रविंद्र चव्हाण ती अतिशय गांभीर्याने घेतात. त्याची एक वेगळी स्टाईल आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांचा प्रत्यय आला. पालघर व रत्नागिरी- सिंधुदुर्ग या दोन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पक्षाने त्यांच्याकडे दिलेली होती. ती त्यानी आपल्या स्टाईलने नियोजन करुन महाराष्ट्रात इतर ठिकाणी पडझड होत असताना या दोन्ही जागा काढल्या.
स्व. वसंतराव पटवर्धन यांच्या नंतर त्यांनी या मतदार संघाची धुरा जेष्ठ विचारवंत, लेखक आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे माजी अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. अशोकराव मोडक यांच्याकडे सोपवली. मला आठवत अशोकरावांची उमेदवारी जाहीर झाल्यावर सावंतवाडीत त्यांच्या प्रचाराच्या नियोजनाची बैठक स्व.माजी आमदार स्व. वसंतराव पटवर्धन, माजी आमदार अशोकराव मोडक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ पदाधिकारी स्व. अरविंद रानडे यांच्या उपस्थितीत माझ्या निवासस्थानी झाली होती. तेव्हा आता सारख्या सुविधा आणि बक्कळ पैसाही नव्हता. मतदारही कमी होते. तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे निवडणुकीचे आर्थिक नियोजन साधारण जास्तीत जास्त पाच हजार रूपये. मोजक्याच दोन तीन कार्यकर्त्यांच्या चारचाकी यापेक्षा कोणत्याही प्रकारची आता सारखी निवडणूक मशिनरी नव्हती. प्रामाणिक व पदरमोड करून काम करणारे कार्यकर्ते हीच पक्षाची ताकद. दोन वेळा अशोकराव निवडून आले… आणि माझ्या सुदैवाने दोन्ही वेळा त्यांच्या प्रचारात मला काम करता आलं. अशोकरावांचा संपूर्ण कोकण पदवीधर मतदार संघात दांडगा संपर्क होता. आपण ज्या पदवीधरांचं प्रतिनिधित्व करतो त्यांचे प्रश्र ते सभागृहात सातत्याने मांडत. पाचही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पदवीधर मंचाची स्थापना केली होती.
डावखरे यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. निरंजन डावखरे यांचे पिताश्री स्व. वसंत डावखरे यांचे स्व बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांच्या यांच्याशी जवळीक होती. त्यांना मानणारा मोठा वर्ग ठाण्यात आजही आहे त्यामुळे त्याचाही लाभ डावखरे याना होईल तसेच सर्वांशी ते अतिशय आदराने वागतात मात्र ते गेली दहा बारा वर्षे या मतदारसंघात संपर्क ठेवायला खूपचं कमी पडले निदान यावेळी तरी ही उणीव त्यांनी भरून काढली पाहिजे अशी अपेक्षा अनेक मतदार व्यक्त करत आहेत.
*संवाद मिडिया*
🤵♀🤵♂👩⚖️🧑⚖️🤵♀🤵♂👩⚖️🧑⚖️🤵♀🤵♂
*प्रवेश सुरू.. प्रवेश.. सुरू… प्रवेश सुरु! 2024-2025*
*१०वी – १२वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पस
*भोसले नॉलेज सिटी* येथे
*👉१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️सिव्हील इंजिनिअरिंग
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
https://sanwadmedia.com/138036/
*👉१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग
*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय
https://www.ybit.ac.in
*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲9404272566*
*डिग्री :*
*📲 9604272566*
*👉१२ वी नंतर डिग्री/डिप्लोमा फार्मसीला प्रवेश सुरु!*
▪️डी.फार्म
▪️बी.फार्म
▪️एम.फार्म
*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व नॅक मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज
www.sybespharmacy.com
*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲8600380717*
*डिग्री:*
*📲8275651704*
*भोसले नॉलेज सिटी*
*चराठे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
www.bkcedu.com
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138036/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*