You are currently viewing आम. नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे निमित्त देवगड व पडेल येथे वीज कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप…

आम. नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे निमित्त देवगड व पडेल येथे वीज कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप…

आम. नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे निमित्त देवगड व पडेल येथे वीज कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप…

देवगड

कणकवली विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देवगड जामसंडे शहर भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने शहर अध्यक्ष दयानंद पाटील यांच्या संकल्पनेतून मराराविवी कंपनी मध्ये सेवा बजाविणारे कर्मचारी (वायरमन)यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याना प्रधानमंत्री सुरक्षा विमा अपघात विमा योजनेचा लाभ देण्यात आला.तसेच पावसाळी हंगामात आवश्यक असलेले रेनकोट चे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी माजी आम.अजित गोगटे,भाजप तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर,सरचिटणीस शरद ठुकरुल, देवगड जामसंडे शहर युवा मोर्चा अध्यक्ष दयानंद पाटील,महिला अध्यक्ष उषकला केळुसकर तन्वी शिंदे,नगरसेविका तन्वी चांदोस्कर रचाली पाटकर,माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर,माजी नगरसेवक उमेश कणेरकर, वैभव करंगुटकर,रविंद्र कोयंडे, दिलेश साटम,ललित चांदोस्कर,जीवन रामाणे, शशांक सकपाळ,किरण पाटील,परमेश्वर शिंदे तसेच मराराविवी कंपनीचे उपविभागीय अधिकारी राहुल निमकर,सहा.अभियंता शिल्पा माने,स्वप्नील उमरीकर ,वीज कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा