*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सन्मा.सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*
*वटपौर्णिमा*
दोन दिवसांपूर्वी वटपौर्णिमा साजरी झाली.त्यानिमित्तानेमाझ्या
मनात आलेले विचार मांडतआहे वडपौर्णिमेचा हा दिवस, .समस्त हिंदू स्त्रियांच्याजिव्हाळ्याचा दिवस! हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट! तिची दरवर्षी उजळणी करत आठवण काढतआम्ही स्त्रिया वडाची पूजा करतो.दिवसभर उपवास करतो .जुन्या काळी अन आताही काही स्त्रियातीनदिवसाचे
वटपौर्णिमेचे व्रत करतात.
सावित्रीने काळपुरुषाकडून
आपल्या पतीच्या प्राणाचे वरदान मिळविले.अशी गोष्ट आपण नेहमी ऐकतो. यमाने विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची तिने चाणाक्षपणे योग्य उत्तरे दिली व त्याबदल्यात आपल्य सासऱ्याचे गेलेले राज्य, त्यांना दृष्टी व पतीचे प्राण मिळविले अशी कथा आहे तो दिवस होता जेष्ठ शुक्ल पौर्णिमा! तेंव्हापासून अखंडसौभाग्यप्राप्ती
व सुखसमृद्धी साठी हे व्रत आपल्या देशात केले जाते काळ बदलला, विचार बदलले परंतु वर्षानुवर्षे हिंदूस्त्रिया हे व्रत करीत मात्र काही वेळा असेही दिसते की करायचे म्हणून केले जाते हे व्रत! त्यामागील। भावना या धकाधकीच्या काळात दिसत नाहीत .मुबंई पुणे यासारख्या मोठ्या शहरातील नोकरी करणाऱ्या स्त्रिया काय सुट्टी काढून हे व्रत करीत बसणार?
फारफार तर बाजारातून पाच दहा रुपयांची एक वडाची फांदी विकत घेऊन ती कुंडीत ठेवून
धावपळ करीत त्या फांदीची कशीबशी पूजा करणार, जमलं तर उपास नाहीतर — …
वेळ कुणाला आहे हे करत बसायला अशी भावना! खेड्यापाड्यातील स्त्रिया हे व्रत अतिशय हौसेने श्रद्धेने करतात परंतु सर्वसाधारण विचार करता या व्रताकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही करायचे म्हणून करायचे हीच भावना जास्त!
.सुंदर साडी दागदागिने नथ गजरा सेंट मेकअप असा साजशृंगार करून पाच दहा मैत्रिणी मिळून वडाला जातात. वडाची पूजा करतात. कुणीतरी फोटो काढणारेअसतेच! रील बनवले जाते! अन घरी पोहचण्याआधी फेस बुक वर दिसते !असे आजचे थोड्या फार फरकाने वडपौर्णिमेचे स्वरूप आहे . नटण्यात गुंग असलेल्या स्त्रियांच्या च्या मनात सात जन्म हाच पति मिळो हा विचार तरी असत असेल का असे मला काही वेळा उगीचच वाटते कारण वडापाशी पोहचल्यावर पूजेचे सामान काढण्याआधी आठवणीने बरोबर आणलेला फोन बाहेर निघतो. मैत्रीणी मिळून फोटो सेशन होते या गडबडीत कसली पूजा अन कसल काय ? उरते फक्त औपचारिकता! फोटो काढण्यात वेळ गेलेला असतो चला गलवकर आधीच उशीर झाला आहे म्हणत घाईघाईने पूजा केली जाते उगीच नाही म्हणत मी! त्या दिवशीचे कोणत्याही महिलेचे स्टेटस पाहिले असेल त्यांना माझ्या म्हणण्याची खात्री पटेल . कुणाला दोष नाही देत! हा काळाचाच महिमा !दुसरे काय?
पूर्वीच्या काळी प्रत्येक प्रथेला सण उत्सवाला अध्यात्मिक बैठक होती धर्माचा धाक होता त्यामुळे सर्व सण त्यापद्धतीने साजरे केले जात! परंतु प्रत्येक वेळी त्यालावैज्ञानिक आधार होता हे नाकारता येणार नाही! पूर्वी स्त्रियांना घराबाहेर निघण्याची बंदी होती पूर्ण आयुष्य रांधा वाढा उष्टी काढा यातच जात असे वडपौर्णिमेची दिवशी पूजेच्या निमित्ताने बाहेर पडता येई वड म्हणजे प्राणवायूचा मोठासाठा त्या शुद्ध हवेने स्रिया उल्हसित होतमैत्रिणी भेटल्याचाही आनंद होई स्त्री सुलभ नटण्याच्या वृत्तीला आनंद मिळे असे हे वडपौर्णिमेचे व्रत !
वड पिंपळ हे वृक्ष ऑक्सिजन चा पुरवठा करणारे आहेत सावित्रीच्या पती अति श्रमाने थकला बेशुद्ध झाला त्याला वडापासून भरपूर प्राणवायू मिळाला असेल काही मोठेवृक्ष मोठ्या प्रमाणावर प्राणवायूचा पुरवठा करतातआजच्या दिवशी एकतरी रोप लावावे बऱ्याच स्त्रिया हळदीकुंकवाच्या दिवशी वाणात लहानसे रोप देतात किती छान पद्धत ! झाडाची होणारी कत्तल वाचवावी झाडे जगवा झाडे वाचवा हा मंत्र घ्यावा जंगलतोडीमुळे जंगलाचे झाडांचे प्रमाण कमी होत आहे ह्याचे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे नाहीतर पुढील पिढीला प्राणवायूचे सिलेंडर पाठीवर घेऊन फिरावे लागेल
प्रतिभा पिटके
अमरावती
९४२१८२८४१३